पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार नारळ फुटला, पण खासदार मेधा कुलकर्णी आल्या नाहीत, कारण…

Pune lok sabha election 2024| ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. पुणेकर आपले मत भाजपला देतील, याचा मला विश्वास आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हा महायुतीचे सगळे नेते उपस्थित होते.

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार नारळ फुटला, पण खासदार मेधा कुलकर्णी आल्या नाहीत, कारण...
murlidhar mohol
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 2:42 PM

पुणे | 14 मार्च 2024 : पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. ग्रामदेवतांच्या दर्शनाने करत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आल्या नाही. त्याचे कारण मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. दरम्यान पुणे शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते. भाजपच्या बैठकीत निवडणुकीत कामाला लागण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. मोहोळ यांना विक्रमी मतांनी निवडून आणा, असे त्यांनी म्हटले.

मेधा कुलकर्णी का आल्या नाहीत?

ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. पुणेकर आपले मत भाजपला देतील, याचा मला विश्वास आहे. प्रचार सुरु करताना महायुतीचे सगळे नेते उपस्थित आहेत. सगळे आमदार आज येथे उपस्थित आहेत. हा आमच्या विजयाचा संकल्प आहे. खासदार मेधा कुलकर्णी दिल्लीत आहेत. म्हणून त्या आल्या नाहीत, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मोदींनी पुण्याचा विकास केला

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे. अनेक प्रकल्प आणि योजना पुणे शहरात सुरु केल्या आहेत. आता पुणेकर सुद्य आहेत ते विकासाला प्राधान्य देतील. सगळे पुणेकर आमच्या सोबत आहे. 100 टक्के आमची एकी शेवटपर्यंत राहणार आहे. दरम्यान, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी जनतेपर्यंत जाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास पुणे मनपातून सुरु झाला. ते नगरसेवक झाले. मनपाच्या शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. २००९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. २०१७-१८ मध्ये पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. तसेच २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद ते होते. पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान जबाबदारी सांभाळली आहे. तसेच २०२३ मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीसपदावर ते होते.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....