चर्चा तर होणारच… पुणेरी मिसळाचा स्वाद दोघे विरोधकांनी घेतला तिसऱ्या उमेदवाराच्या प्रभागात

Lok Sabha Election Maharashtra Politics: पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मनसेमध्ये असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी दिली.

चर्चा तर होणारच... पुणेरी मिसळाचा स्वाद दोघे विरोधकांनी घेतला तिसऱ्या उमेदवाराच्या प्रभागात
वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 8:48 AM

पुणेरी मिसळ अन् पुण्यातील अमृततुल्य (चहा) चांगले प्रसिद्ध आहे. यासाठी विविध कट्टे ठरले आहेत. मिसळची चव कुठे घ्यावी अन् चहा कुठे घ्यावा, हे पुणेकरांना माहीत आहे. यामुळे या ठिकाणी सकाळ असो की दुपार खवय्यांची गर्दी असते. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. पुणे लोकसभेतील तिन्ही उमेदवार जाहीर झाल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून मुरलधीर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. त्यात मनसे सोडून वंचित आघाडीत सामील झालेले वसंत मोरे यांनी रंगत आणली आहे. प्रचार करताना उमेदवारांच्या गाठीभेटी होत राहतात. मग नमस्कार, चमत्कार होतो. आता मुरलीधर महोळ यांच्या प्रभागात रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे एकत्र आले. त्यांनी मिसळपाववर ताव मारला. परंतु त्यावेळी मुरलीधर मोहळ दुसरीकडे प्रचारात होते.

मिसळपावचा स्वाद…पण तिसऱ्या उमेदवारीची कमतरता

पुणे शहरात निवडणूक प्रचारात उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु एकमेकांवर भेटल्यानंतर मैत्रीचे दर्शन होत आहे. पुण्यातील राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वंचित आघाडीकडून मैदानात उतरलेले वसंत मोरे अन् काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मिसळ खाताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

दोन्ही आपआपल्या कार्यकर्त्यांसोबत शेजारी, शेजारी बसून मिसळचा स्वाद घेत आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन त्यांनी मिसळपावचा स्वाद घेतला. त्यावेळी मोहोळ यांची कमतरता जाणवली.

अशी होणार लढत

पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मनसेमध्ये असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी दिली. भाजपकडून माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळ मैदानात उतरले आहे. आता या तिरंगी लढतीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.