पुण्यातून तिकीट कापल्यानंतर जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावर पोस्ट, म्हटले…

Pune lok sabha election 2024 | मुरलधीर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे जगदीश मुळीक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

पुण्यातून तिकीट कापल्यानंतर जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावर पोस्ट, म्हटले...
मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 11:55 AM

अभिजित पोते, पुणे | 14 मार्च 2024 : पुणे लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने पुण्याची जबाबदारी दिली आहे. मुरलधीर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे जगदीश मुळीक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्या पोस्टला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना लाईक केले असून शेअर केली आहे.

जगदीश मुळीक यांनी घेतली होती फडणवीस यांची भेट

पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले होते. त्यात मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली होती. यामुळे नुकतीच जगदीश मुळीक यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवींस यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्या चर्चेचा तपशील मात्र बाहेर आला नव्हता. आता जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटले फेसबुक पोस्टमध्ये

जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.” जगदीश मुळीक यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. पक्षावर निष्ठा कायम ठेवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतूक केले आहे. भविष्यात आपल्यालाही उत्तम संधी मिळणार आहे, हा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

  • सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ
  • पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक
  • २००९ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली
  • २०१७-१८ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष
  • २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद
  • २०१९ ते २०२२ पुणे महापालिकेचे महापौर
  • २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.