पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, संभाजी ब्रिगेडचं मेट्रो व्यवस्थापनाला पत्र

पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकरून करण्यात आली आहे. त्याबाबत संभाजी ब्रिगेडनं एक पत्र महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही दिलं आहे. या पत्रात 13 महापुरुषांची नावंही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत.

पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, संभाजी ब्रिगेडचं मेट्रो व्यवस्थापनाला पत्र
पुणे मेट्रो
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 6:42 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल नुकतीच पार पडली. अजित पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं एक महत्वाची मागणी केलीय. पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकरून करण्यात आली आहे. त्याबाबत संभाजी ब्रिगेडनं एक पत्र महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही दिलं आहे. या पत्रात 13 महापुरुषांची नावंही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत. (Sambhaji Brigade demands naming of metro stations in Pune after great men)

संभाजी ब्रिगेडचं मेट्रो व्यवस्थापनाला पत्र

पुणे हे विद्येचे माहेरघर असून सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा जपणारे शहर आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मँसाहेब यांनी वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यातून रोवली. पुणे जिल्ह्याने दोन छत्रपती दिले. मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर… आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेले आहे. या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपलं पाहिजे म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जपान करण्याचं काम आपण केले पाहिजे.

पुण्याची ओळख जगभर पोहोचली. इथली कर्तुत्वान माती आणि सांस्कृतिक चळवळ समाजासह जगायला अभिप्रेत आहे. त्यामध्ये महा मेट्रोची भर पडली आहे. पुण्यात होणाऱ्या महा मेट्रो स्टेशनला महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

संभाजी ब्रिगेडनं सुचवलेली नावं

1) छत्रपती शिवाजी महाराज 2) छत्रपती संभाजी महाराज 3) मल्हाराव होळकर 4) राजमाता अहिल्या राणी होळकर 5) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले 6) राजर्षी छत्रपती शाहू महाराज 7) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 8) लहुजी वस्ताद साळवे 9) दिनकरराव जवळकर 10) केशवराव जेधे 11) सरसेनापती वीर बाजी पासलकर 12) महादजी शिंदे 13) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

अजित पवारांच्या उपस्थितीत ट्रायल

उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते 30 जुलै रोजी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन – फडणवीस

पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.

इतर बातम्या :

‘संजय राऊतांना अल्झायमर झालाय, त्यांना सकाळचं दुपारी आठवत नाही’, चंद्रकांत पाटलांचा टोला

‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है’, चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला थेट आव्हान

Sambhaji Brigade demands naming of metro stations in Pune after great men

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.