Pune News : पुणे, मुंबईसाठी नीती आयोगाचा मास्टर प्लॅन, राज्यातील शहरांचा विकासासाठी अशी असणार योजना

Pune News : मुंबई आणि पुणे शहरासाठी नीती आयोगाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या शहराचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट वाढवण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली आहे.

Pune News : पुणे, मुंबईसाठी नीती आयोगाचा मास्टर प्लॅन, राज्यातील शहरांचा विकासासाठी अशी असणार योजना
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 2:19 PM

पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे आणि मुंबई शहराचा विकास करण्याकडे केंद्र शासनाने लक्ष दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी महाराष्ट्राचा वाटा महत्वाचा असणार आहे. यामुळे या शहरांचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवून त्याच्या विकासासाठी योजना तयार केली जात आहे. आगामी सात वर्षांसाठी ही योजना असणार आहे. 2030 पर्यंत मुंबईचे सकल राष्ट्रीय उत्पादन 300 बिलियन डॉलर करण्यात येणार आहे. पुण्यासाठी अशीच योजना आहे. देशातील 20 शहरांची यादी नीती आयोगाने केली असून त्यात मुंबई आणि पुणे शहराचा समावेश असणार आहे.

नीती आयोगाच्या बैठकीत काय ठरले

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पुढील सात वर्षांत पुणे, मुंबई शहराचा आर्थिक विकास वेगाने करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला. पुढील चार महिन्यात हा आरखडा तयार होणार आहे. तसेच राज्य सरकारने योजनाच्या अंमलबजावणीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र कसा गाठणार 1 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दीष्ट महाराष्ट्र कसे गाठणार यासंदर्भात माहिती दिली. राज्यातील सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवून आपणास 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. यामुळे देशाला 5 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल. नीती आयोगानुसार, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र हे उद्दिष्ठ गाठू शकते.

हे सुद्धा वाचा

असा होणार विकास

कुशल कामगार, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, समृद्धी एक्स्प्रेससारख्या योजना यामुळे राज्याचा विकास चांगला होणार आहे. यामुळे राज्यात औद्योगिक आणि ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणवर येतील अन् राज्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. राज्यातील पुणे, मुंबईसह देशातील 20 शहरांची निवड करुन त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवण्यात येणार आहे. देशातील जीडीपीचा 70 टक्के वाटा शहरांमधून येणार आहे. यामुळे शहरांच्या विकासावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.