पुण्याच्या कट्टा संस्कृतीत शनिवारपासून ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा ‘

आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन व्हावे,निवडणूक तयारीबद्दल आदानप्रदान करता यावे,सर्वपक्षीय विचारांची देवाणघेवाण व्हावी,शहरातील वातावरण द्वेषमुक्त राहावे.याकरिता हा कट्टा सुरू करण्यात येत आहे.

पुण्याच्या कट्टा संस्कृतीत शनिवारपासून 'पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा '
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 7:31 PM

पुणे- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या समंजस, सुसंस्कृत , सर्वसमावेशक संस्कृतीला पुढे नेण्यासाठी रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व कार्यकर्त्यांना खुले असणारे विचारांचे आदान-प्रदान करणारे कट्टा व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.या व्यासपीठाला ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा’ असे नाव देण्यात आले आहे. शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते (११ डिसेंबर, रोजी सकाळी १० वाजता) अण्णा इडली हॉटेल (मार्केट यार्ड गेट जवळ ) येथे या उपक्रमाच्या उद्घाटन आहे. लोकजनशक्ती पार्टी​ पुणे शहर-​​जिल्हा ​​अध्यक्ष​​ संजय ​आल्हाट,​प्रदेश सरचिटणीस​ अमर पुणेकर​,​​उपक्रमाचे समन्वयक ​डॉ​. दीपक बीडकर​ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ​​

उद्घाटन कार्यक्रमाला पुण्यातील राजकीय नेते आणि कट्टा संस्कृतीतील अग्रणी डॉ. सतीश देसाई,(काँग्रेस नेते आणि वाडेश्वर कट्टा प्रणेते),अंकुश काकडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते,वाडेश्वर कट्टा प्रणेते),अॅड.गणेश सातपुते (मनसे नेते,वैशाली कट्टा,पुणे कट्टा प्रणेते)उपस्थित राहणार आहेत.

विचारांचे होणार आदान- प्रदान आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन व्हावे,निवडणूक तयारीबद्दल आदानप्रदान करता यावे,सर्वपक्षीय विचारांची देवाणघेवाण व्हावी,शहरातील वातावरण द्वेषमुक्त राहावे.याकरिता हा कट्टा सुरू करण्यात येत आहे. एकेकाळी ‘मंडई’ हाच सामाजिक-राजकिय कार्यकर्त्याचा कट्टा हा वैचारिक आदान प्रदानाचा ठिय्या होता, आता विस्तारित पुण्याचा ‘मार्केट यार्ड कट्टा’हादेखील ठिय्या व्हावा,असा मनोदय आहे,असे संजय आल्हाट यांनी सांगितले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा ; जाणून ‘घ्या’ कारण

Nagpur MLC Election : काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, छोटू भोयर ऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर

Nagpur Railway | रेल्वेतून दहा किलो गांजा जप्त, कोचच्या बाथरुममध्ये होता पडून; आरोपींचा पत्ता नाही

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.