पुणे- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी घटली असली तरी ओमिक्रॉनच्या विषाणूने डोके वर काढले आह. जिल्ह्यात नव्याने ओमिक्रॉनचे 13 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात ओमिक्रॉनची एकूण रुग्ण संख्या 35 इतकी झाली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे महापालिका प्रशासन सर्तक (Municipal administration alert) झाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनानाने केले आहे.
नाताळ व नवीन वर्ष साधेपणाने साजरे करा
दिवाळी दरम्यान शहारातील कोरोनाची(corona) रुग्णसंख्या बरीच दिलासा दायक झाली होती. मात्र दिवाळीनंतर पुन्हा शून्यावर गेलली रुग्णसंख्येने 100 पॅरा केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यात अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ व नवीन वर्षामुळे पुन्हाएकदा बाजारपेठा खाऊ गल्ल्या गजबजू लागल्या आहेत. ठीक ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रवाश्यांचीही ये- जा वाढणार आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोकाही वाढणार आहे. साहजिकच ओमिक्रॉन व कोरोनासाठी पूरक वातावरण निर्माण होईल अशी भीती महापालिकेला वाटतं आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच नाताळ व नववर्ष साधेपणाने साजरे करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
जिल्ह्यातील ओमिक्रॉनची स्थिती
गुरुवारी राज्य आढळल्या ओमिक्रॉनच्या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 35 वर जाऊन पोहचली आहे. 13 रुग्णांपैकी तीन रुग्ण महापालिकेच्या क्षेत्रातील आहेत. तर तीन पुणे ग्रामीण परिसरातील आहेत. सात रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.
कोरोनाचे रुग्ण किती?
जिल्ह्यात काल( गुरुवार) 187 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 79 रुग्ण पुणे महानगरपालिकेत तर पिंपरीत 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 लाख 61 हजार784 इतकी झाली आहे. तसेच पुणे शहरात आतापर्यंत चार लाख 98 हजार 618 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यावर भर
पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ओमिक्रॉनच्या विषाणूंचे नवीन संकट डोक्याभोवती फिरत आहे. याला अटकाव घालण्यासाठी शहरात कोरोनाची वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. सद्यस्थितीला शहरातील या 185 लसीकरण केंद्रावर महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्याबरोबरच कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालये सुज्ज आहे. याबरोबरच शहरातील जम्बो कोविड रुग्णालयाची ‘रेडी टू युझ’ (Ready To Use)या स्थितीत तयार ठेवले आहे. वाढता धोका लक्षात घेत वैद्यकीय यंत्रणाही तयार असल्याची माहिती महापालिका प्रशासने दिली आहे.
नागरिकांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक
– सोशल डिस्टंटचे पालन करणे
– मास्कचा वापर करणे.
– गर्दी करणे टाळा
– याबरोबरच नाताळ सण ही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
लोणावळ्यात लसीचे दोन डोस बंधनकारक
लोणावळ्यामध्ये नाताळ सण आणि नवीन वर्ष साजरा करायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते त्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा पोलिसांचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागातील हॉटेल,लॉज,बंगले मालकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांचे दोन लसीचे डोस झाले असल्याचे प्रमाणपत्र पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
नाशिककरांना 2 तासांत दिल्ली गाठता येणार; जानेवारीत विमानसेवा होणार सुरू, गोव्यासाठीही हवाहवाई…!
children vaccination : मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची ‘ब्लू प्रिंट’, असे आहे नियोजन