पुणे महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम, पहिल्या टप्प्यात 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध

पुणे महापालिकेनं 'व्हॅक्सीन ऑन व्हिल्स' हा उपक्रम हात घेतलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं.

पुणे महापालिकेचा आता 'व्हॅक्सीन ऑन व्हिल्स' उपक्रम, पहिल्या टप्प्यात 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:40 PM

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हात घेतलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं. हा उपक्रम राबवण्यासाठी पुणे महापालिकेला ‘जिव्हीका हेल्थकेअर’ आणि ‘माय व्हॅक्सीन’ची साथ लाभली आहे. लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. (Pune Municipal Corporation’s ‘Vaccine on Wheels’ initiative to prevent corona outbreak)

पुणे शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक व्हॅनमध्ये 1 डॉक्टर, 2 परिचारिका, 1 आरोग्य नोंदणी सहाय्यक, 1 आरोग्य समाजसेवक, 1 चालक आणि एईएफआय किटसह 1 रुग्णवाहिका असणार आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपले विविध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती महापौरांना दिली. त्याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी

भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या ऑगस्ट महिन्यांच्या अखेरीस कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून या प्लांटमधून जास्तीत जास्त लसीचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात या कंपनीकडून शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती करण्यात येईल. यासाठी भारत बायोटेकच्या हैदराबाद आणि नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मधील निवृत्त शास्त्रज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन, महावितरण, केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम सुरु आहे. तर तिसऱ्या टप्प्यात यंत्रसामग्री तपासणीचे काम पूर्ण करण्यात येईल.

कोरोना रुग्णांसाठी‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी’

रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना काही दिवस घरीच होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलं जातं. मात्र, कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेनं ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी’ हा उपक्रम सुरु केलाय. या उपक्रमाद्वारे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिली जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यात म्युकरमायकोसिसचा विळखा, कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण

होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही, महापालिकेची माहिती

Pune Municipal Corporation’s ‘Vaccine on Wheels’ initiative to prevent corona outbreak

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.