AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओशो आश्रमाच्या बाहेर राडा, आश्रम प्रशासन आणि अनुयायांमधील वाद विकोपाला, वादाचं कारण काय?

ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता. संन्याशी माळा घालून ओशो अनुयायांनी प्रवेश केला मात्र काही वेळेपुरताच हा प्रवेश राहिला.

ओशो आश्रमाच्या बाहेर राडा, आश्रम प्रशासन आणि अनुयायांमधील वाद विकोपाला, वादाचं कारण काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 3:22 PM

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पुणे शहरातील ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायामधील वाद विकोपाला गेला आहे. ओशो आश्रमाच्या बाहेर अनुयायांकडून आंदोलन उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमध्ये वाद सुरू आहे. आज मात्र हे आंदोलन चिघळलं असून अनुयायांनी धक्काबुक्की करत आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज बघायला मिळालाय. ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून वातावरण चांगलेच चिघळले आहे. सकाळपासूनच ओशो तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता. संन्याशी माळा घालून ओशो अनुयायांनी प्रवेश केला मात्र काही वेळेपुरताच हा प्रवेश राहिला. त्यानंतर मात्र मोठा राडा आश्रमाच्या बाहेर पाहायला मिळाला.

पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे दाखल झाला होता. त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यामध्ये संन्याशी माळा घालून आश्रमात प्रवेश करण्याची परवानगी नसल्याने हा वाद निर्माण झाला होता. यामध्ये जवळपास दोनशे अनुयायी यावेळेला आंदोलन करीत आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील ओशो आश्रमात संन्याशी माळा घालून प्रवेश शुल्क न भरता प्रवेश करण्याचा आग्रह ओशो अनुयायांनी केला होता. त्याला विरोध ओशो व्यवस्थापकाने केला आहे. हाच विरोध झुगारून अनुयायी आक्रमक झाले होते. आपल्या मागणीवर अनुयायी ठाम असल्याने हा वाद चिघळला आहे.

ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात ओषो अनुयायी आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केंला होता. त्या दरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये अनेक अनुयायी जखमी झाले आहेत.

खरंतर पुण्यातील ओशो आश्रमातील वाद काही नवीन नाही. यापूर्वी देखील हे आश्रम वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. त्यामध्ये आता पुन्हा संन्याशी माळा घालून शुल्क न देता प्रवेश करण्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यात आज हा अधिकच चिघळला आहे.

ओशो आश्रम व्यवस्थापनाने काही नियम सांगत ओशो अनुयायांना काही बंधने घातली आहेत. तीच बंधने ओशो अनुयायांना नाहीतर. त्यामुळे हा वाद चिघळलळा आहे. त्यामुळे आज सकाळ पासूनच हा वाद सुरू असतांना अचानक हे आंदोलक भडकले आणि आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.