Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेला पुण्यातून 12 ते 15 हजार मनसैनिक जाणार तर तब्बल 150 गाड्यांचा असणार ताफा

राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक (MNS) पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा काल मनसे नेत्यांनी दावा केला होता.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेला पुण्यातून 12 ते 15 हजार मनसैनिक जाणार तर तब्बल 150 गाड्यांचा असणार ताफा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 1:18 PM

पुणे : उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून औरंगाबादकडे (Aurangabad) मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक (MNS) पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा काल मनसे नेत्यांनी दावा केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही सभा चर्चेत आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसे नेत्यांची फौज मैदानात उतरली होती. अनेक संघटनांकडून या सभेला विरोध करण्यात आला होता, तसेच धार्मिक तेढ निर्माण होण्याचे कारण देण्यात येत होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसही सर्व बाबींची पडताळणी करूनच परवानगी देण्याच्या पवित्र्यात होते.

अटींचे पालन आवश्यक

आधी तर पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती, आता ती मिळाली आहे. मात्र जवळपास 16 अटी पोलिसांनी घालून दिल्या आहेत. त्या पालन करणे बंधनकारक आहे. त्याची पायमल्ली झाल्यास कारवाई होणार आहे.

भीम आर्मी ठाम

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला होता. आता परवानगी तर मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग राज ठाकरेंनी केल्यास सभेतच घोषणा देऊन ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही भीम आर्मीने म्हटले आहे.

अयोध्येतूनही येणार कार्यकर्ते

पुण्यातून तर कार्यतर्ते येणार आहेतच शिवाय अयोध्येतूनही जवळपास अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. सभेची तयारी पूर्णपणे आम्ही करत आहोत. स्टेजचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. असे मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....