‘व्हॅलेंटाईन डे’ पुर्वी गुलाबाच्या परदेशी प्रवासाला ‘जीएसटी’चे काटे

गुलाबाची क्रेज परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. परदेशी बाजारपेठेत यंदा गुलाब फुलांना मोठी मागणी आहे. मात्र प्रवासाचा खर्च तीन पट वाढला आहे.

'व्हॅलेंटाईन डे' पुर्वी गुलाबाच्या परदेशी प्रवासाला 'जीएसटी'चे काटे
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 11:59 AM

मावळ,पुणे : शेतकऱ्यांसमोर संकटे सुरुच असतात. अनेकदा शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा फटका बसतो. कधी नैसर्गिक संकटातून तारला गेला तर बाजारात भाव मिळत नाही. भाव मिळाला तर सरकारकडून कर लादला जातो. फुल उत्पादक शेतकरी (farmer) या अडचणींना सामोरे जात आहे. दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी (valentine day) मावळ तालुक्यातून गुलाबाची लाखो फुले निर्यात केली जातात. यावर्षी वातावरण उत्तम राहिल्याने गुलाब फुलांच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाली.

तसेच मावळ तालुक्यातील गुलाबाची क्रेज परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. परदेशी बाजारपेठेत यंदा गुलाब फुलांना मोठी मागणी आहे. मात्र प्रवासाचा खर्च तीन पट वाढला असून त्यावर 18% जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे परदेशी बाजारात फुलांची निर्यात म्हणजे तोटा सहन करणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांना हवी सवलत

शासनाकडून गुलाबाच्या फूल विक्रेत्यांना सवलत मिळत नाही. दुसरीकडे परदेशी बाजारपेठ टिकवणे गरजेचे असल्याने तोटा सहन करत माल पाठविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. 29 जानेवारी रोजी पहिली शिफमेंट परदेशात रवाना झाली आहे. नऊ फेब्रुवारीपर्यंत परदेशात माल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व माल स्थानिक भारतीय बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. यामुळे परदेशी प्रवासासाठी शेतकऱ्यांना सवलत हवी आहे.

व्हॅलेंटाईन गुलाब का लागतो

व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. Rose Day दरवर्षी 7 फेब्रुवारीला करतात त्यायासाठी लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा अशा विविध रंगाच्या गुलाबाची फुले लागतात. रोझ डे हा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे.

रोझ डेचा इतिहास

गुलाबाचे फूल भावना व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. राणी व्हिक्टोरियाच्या काळात, लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.