२७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर ; ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतीमधील ५०३ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीची आचारसंहिता २७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे.

२७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर ; ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 4:27 PM

पुणे- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये,  म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतीमधील ५०३ रिक्त सदस्य पदांसाठी  निवडणूक

पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतीमधील ५०३ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीची आचारसंहिता २७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी व निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याच्या तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

हे असतील निर्बंध

  • आचारसंहिता कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता गुन्हा असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास निर्बंध असतील.
  • पोटनिवडणूक कालावधीत सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृह याठिकाणी मिरवणूक, मोर्चा  तसेच घोषणा यांना बंदी असेल.
  • शासकीय कार्यालयात  वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे आदी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात आली आहे.

पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये ५ पेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरण्यास निर्बंध असतील. कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाऊंड स्पीकरचा) वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरून धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये. ध्वनीक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे सकाळी ६ पूर्वी व रात्री १० वाजल्यानंतर करता येणार नाही.पोटनिवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे, चौकी स्वाधीन अधिकारी यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? शेलारांच्या सवालावर आता नवाब मलिकांचा पलटवार

Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!

IND vs NZ : पहिली टेस्ट ड्रॉ, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट, टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.