पुणे शहरात 30 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण! एका दिवसात 64 हजार नागरिकांना लस
पुणे (Pune) शहरानं कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.
पुणे : पुणे (Pune) शहरानं कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत 30 लाख 46 हजार 995 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आज एका दिवसात 63 हजार 993 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पुणे महानगरपालिकेनं याबाबत माहिती दिली आहे. (3 million people in Pune have been vaccinated against corona)
पुणे शहरामध्ये ३० लक्ष लसीकरणाचा टप्पा पूर्ण !#PMCVaccination#PuneFightsCorona#PMCFightsCorona pic.twitter.com/Dvs9JCohy6
— PMC Care (@PMCPune) August 27, 2021
एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरण
पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एक लाख 15 हजार जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा लसीकरणाने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात लसीकरणाने ७७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे.
पुण्यात घरोघरी लसीकरण मोहीमेला सुरूवात
पुणे महानगपालिकेकडून थरुणाला खिळलेल्यांना घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या आठवड्यापासून ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजारपणामुळे अनेक नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी महानगरपालिकेने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. ज्यात अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन कोरोनाची लस दिली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहेत. त्यासाठी नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पूर्तता करून जमा करण्याचं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
घरी लसीकरणासाठी कसा करणार अर्ज?
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी bedriddenvaccination.pune@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
इतर बातम्या :