पुणेकरांसाठी खूशखबर, 35 हजार कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प, काय होणार बदल

Pune News | पुणेकरांसाठी दिवाळी भेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. हे प्रकल्प तब्बल 35 हजार कोटी रुपयांचे आहेत. यामुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधेत मोठी भर पडणार असून विकास कामांना वेग येणार आहे. मेट्रोनंतर हा मोठा प्रकल्प असणार आहे.

पुणेकरांसाठी खूशखबर, 35 हजार कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प, काय होणार बदल
nitin gadkari Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 9:19 AM

अभिजित पोते, मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : पुणे शहर हे शिक्षणाचे केंद्र आहे. तसेच पुण्याच्या औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पुणे आयटी हब झाले आहे. यामुळे देशभरातून पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुणे शहर वाढत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधा अपूर्ण ठरत आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. सुमारे 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी माध्यमांना ही माहिती दिली. यामुळे पुण्याच्या विकासात अधिकच भर पडणार आहे.

काय आहेत प्रकल्प

नितीन गडकरी यांनी मंजुरी केलेल्या दोन प्रकल्पांत एक प्रकल्प पुणे शहराशी संबंधित आहे. पुणे शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प पुणे- छत्रपती संभाजीनगरमधील आहे. या दोन शहरांना जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. चाकण, तळेगावमार्गे हा रस्ता तयार होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत हा महामार्ग तयार केला जाणार आहे.

पुण्याचा विकासात भर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे शहराच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील समस्यासंदर्भात नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्पावर भर दिला जात आहे. पुण्यात स्कायबसचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. स्काय बस, मेट्रो या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होणार आहे. तसेच पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेस इलेक्ट्रीक करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.