AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात, पुण्यात कुठे आहेत मदत केंद्र, किती आहे कटऑफ? पाहा एका क्लिकवर

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी ५३ मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे.

अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात, पुण्यात कुठे आहेत मदत केंद्र, किती आहे कटऑफ? पाहा एका क्लिकवर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 2:36 PM

पुणे : उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची (11th Admission) सीईटी (CET) रद्द केल्यानंतर आजपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया (11th Admission Process) सुरू करण्यात आली आहे. पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) या भागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सगळी माहिती 11thadmission.org.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. (53 guidance centers have been set up for Pune and Pimpri Chinchwad area to solve the problems of students and parents during the 11th online admission process.)

२२ ऑगस्टपर्यंत चालणार पहिला राउंड

महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली. विद्यार्थी स्वतःचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

मदतीसाठी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी ५३ मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे.

या सेंटर्सशी संपर्क साधल्यानंतर तिथले प्रतिनिधी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतील. https://pune.11thadmission.org.in/  या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातल्या सर्व ५३ मार्गदर्शन केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तुमच्या झोननुसार तुम्ही या केंद्रांवर जाऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या अडचणी सोडवता येतील.

पुण्यात किती आहे ११ वीसाठीचा कट ऑफ?

यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर १० वीचे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा भरभरून गुण मिळाले आहेत. त्यामुळे ११ वी प्रवेशासाठी चांगलीच चुसर आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण म्हणजेच कट ऑफ (Cut Off for 11th admission) यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी तिन्ही राउंडसाठीच्या कटऑफ बद्दलची माहिती ११ वी प्रवेशाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

11th Admission : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमएमआरडीएसह कोणत्या जिल्ह्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरु?

11th Admission : मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार?

हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.