थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, Pimpri Chinchwad शहरातल्या 78 मालमत्ता ‘सील’, 60 नळ कनेक्शनही तोडले!
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 78 मालमत्ता ‘सील’ (Sealed) करण्यात आल्या आहेत तर 60 मालमत्तांचे तोडले नळ कनेक्शन (Plumbing) तोडण्यात आले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 78 मालमत्ता ‘सील’ (Sealed) करण्यात आल्या आहेत तर 60 मालमत्तांचे तोडले नळ कनेक्शन (Plumbing) तोडण्यात आले. महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मार्चअखेर कर वसुलीसाठी जोर लावला आहे. जप्तीकरता थकबाकी असलेल्या 442 मालमत्तांचे नियोजन केले होते. त्यापैकी 329 मालमत्ता आता जप्त केल्या आहेत. त्यातील 193 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22मध्ये आत्तापर्यंत 472 कोटी 37 लाख मालमत्ता कर वसूल झाला आहे. तर आत्तापर्यंत 78 थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रत्यक्ष ‘सील’ केल्या आहेत. 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले असून अशा 138 मालमत्ताधारकांवर कारवाई केल्याची माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.
अधिक तीव्र करणार कारवाई
थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम ही आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आता केलेल्या कारवाईवरून महापालिकेने हेच दर्शवले आहे. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेनुसार मालमत्तांच्या थकीत मूल कराचा भरणा करावा आणि होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.