पुणे | 21 ऑगस्ट 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यागाथेने प्रत्येक मराठी व्यक्तीच नाही तर देशातील प्रत्येक जण भारवून जातो. महाराजांच्या पराक्रमासंदर्भात ऐकताना वयाचे भान राहत नाही. अगदी बाल्यअवस्थेतील चिमुरडा असो की ९०-९५ वर्षाचा युवा असो त्याच्या अंगात जोश भरतो. यामुळे शिवाजी महाराजांचे गड, किल्ले पाहण्यासाठी गर्दी होत असते. परंतु वयाच्या ९५ वर्षी पाय जाऊन महाराजांचा किल्ला सर करण्याचा निश्चिय केला तर? अनेकांना वाटेल हे शक्य नाही. परंतु एका आजीबाईने हे शक्य करुन दाखवले. महाराजाच्या जन्मस्थळी जाऊन त्या नतमस्तक झाल्या.
आपल्याकडे साठीनंतर व्यक्ती निवृत्त होतो. ८० वर्षानंतर अनेकांना गडावरील धार्मिक स्थळावर जाणे अवघड होते. परंतु वय कोणत्याही सहसाच्या आडी येऊ शकत नाही. हे एका ९५ वर्षीय आजीबाईने दाखवून दिला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला सर करण्याचा निर्णय घेतला. या ९५ वर्षीय आजीने पायी चालत शिवनेरी किल्ला केला. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा कौसाबाई महादु ढोले यांनी व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेला कुटुंबियांकडून लागलीच प्रतिसाद मिळाला.
वय वर्ष फक्त ९५, पाहा या तरुण आजीबाईने शिवाजी महाराजांचा किल्ला कसा सर केला#Shivneri #ShivajiMaharaj pic.twitter.com/CbwBXXz9US
— jitendra (@jitendrazavar) August 21, 2023
कौसाबाई ढोले यांनी चारही बाजूंनी कठीण चढाव असलेला शिवनेरी पायीच जाऊन सर करण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते असे बांधलेले ठिकाण आहे. मग आजाबाईंनी हा किल्ला सर केला. या वयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी त्यांनी सर केल्यामुळे सर्वच आवक झाले.
कौसाबाई ढोले गडावर पोहचल्यावर म्हणाल्या, माझी शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पाहण्याची इच्छा होती. यामुळे हा गड चढून आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पाळणा पहिला. संपूर्ण किल्ला पाहिला.
मजा आली, खूप आनंद झाला. किल्ला चढताना फारसा थकवाही जणावला नाही.