बापरे !!! १५ -१६ फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळं वाचला जीव

सविता चौगुले विहिरीत पडल्याचे समजताच शेजाऱ्यांनी तातडीनं अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाने तात्काळ दखल घेत घटनास्थळावर धाव घेतली. वेळ न दवडता विहिरीत उतरले. दोरीचा वापर करत अवघ्या काही मिनिटातच पीडितेला पाण्याच्या बाहेर काढत तिचे प्राण वाचवले.

बापरे !!! १५ -१६ फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळं वाचला जीव
well
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 3:56 PM

पुणे- शहरातील सोमवार पेठे येथील दांडेकर(मोटे)वाड्यातील 15- 16 फूट खोल विहिरीत महिला पाय घसरून पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत तात्काळ महिलेला बाहेर काढलं आहे. सविता चौगुले(42) असे पीडित महिलेचे नाव असून उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविता चौगुले या सद्यस्थितीला वारजे माळवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे सोमवार पेठेतील दांडेकर(मोटे)वाड्यात जुने घर आहे. घटनेच्या वेळी त्या जुन्या घरी फेरफटका मारण्यास आल्या होत्या. त्याच दरम्यान विहिरीमध्ये डोकावून बघत असताना, त्यांचा पाय घसरल्यानं त्या विहिरीत पडल्या.  सविता चौगुले विहिरीत पडल्याचे समजताच शेजाऱ्यांनी तातडीनं अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाने तात्काळ दखल घेत घटनास्थळावर धाव घेतली. वेळ न दवडता विहिरीत उतरले. दोरीचा वापर करत अवघ्या काही मिनिटातच पीडितेला पाण्याच्या बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच पीडितेचा जीव वाचल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे. जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या अग्निशामक दलाचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी आभारही मानले.अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे व तांडेल राजाराम केदारी हे प्रत्यक्ष पाण्यात उतरून महिलेचा जीव वाचवला. या बचाव मोहिमेत प्रदीप खेडेकर, चालक हनुमंत कोळी, नवनाथ मांढरे व जवान छगन मोरे, सचिन जौंजाळे, प्रकाश शेलार, मयुर कारले, केतन नरके, विशाल गायकवाड यांचा सहभाग होता.

संबंधित बातम्या :

ST कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ; प्रवाशी हवालदिल, पण ऑनलाईन व ऑफलाईन बुकींगचे पैसे मिळतायत परत 

आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.