Abu Azmi: राज ठाकरेंना विरोध अयोध्येतून, बळ महाराष्ट्रातून; भाजप खासदाराला अबू आझमींचा फोन करून पाठिंबा

Abu Azmi: राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेवरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.

Abu Azmi: राज ठाकरेंना विरोध अयोध्येतून, बळ महाराष्ट्रातून; भाजप खासदाराला अबू आझमींचा फोन करून पाठिंबा
राज ठाकरेंना विरोध अयोध्येतून, बळ महाराष्ट्रातून; भाजप खासदाराला अबू आझमींचा फोन करून पाठिंबाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 5:07 PM

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जून रोजी ते अयोध्येला (ayodhya) पोहोचणार आहेत. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकतो, असं सांगत महाराष्ट्र भाजपने राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं. पण भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. बृजभूषण सिंह (brijbhushan singh) असं या भाजपच्या खासदाराचं नाव आहे. राज ठाकरे मिलिट्री घेऊन आले तरी त्यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. आमच्या मृतदेहावरून राज यांना जावं लागेल, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. सिंह यांच्या या भूमिकेचं समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी स्वागत केलं आहे. एवढंच नव्हे तर आझमी यांनी थेट सिंह यांना फोन करून त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध होत असताना महाराष्ट्रातूनही या विरोधाला बळ मिळत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेवरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. एक भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगळता सिंह यांना भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याने विरोध केलेला नाही. त्यामुळे सिंह यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला पाठिंबा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातूनही बृजभूषण सिंह यांना पाठिंबा मिळत आहे. आमदार अबू आझमी यांनीही सिंह यांना फोन करून पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

खासदाराचा विरोध का?

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे मनसे सैनिकांनी यूपी, बिहारच्या तरुणांना मारहाणही केली होती. त्याचे देशभर पडसाद उमटले होते. त्यामुळे बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. तरच उत्तर प्रदेशात यावं. नाही तर त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असं सांगतानाच योगी आदित्य नाथ यांचा सल्ला मी घेत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

आझमींचा पाठिंबा का?

समाजवादी पार्टीने सातत्याने राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांविरोधीतील भूमिकेवर अबू आझमी यांनी सातत्याने टीका केली आहे. प्रसंगी समाजवादी पार्टी आणि मनसेत संघर्षही उडालेला आहे. आता भाजपच्याच खासदाराने विरोध केल्यामुळे आझमी यांनी त्याचं स्वागत केलं आहे. राज ठाकरेंना अडचणीत आणणं आणि भाजपची कोंडी करणं ही आझमी यांची यामागची खेळी असल्याचं बोललं जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.