Pune-Ahmednagar Accident: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची-कारला धडक; एकाच कुटुंबीतील 5 जण जागीच ठार
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे.कारला ट्रकची धडक बसल्यानंतर जागीच पाच जण ठार झाले आहेत. अपघात झाल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.
पुणेः चुकीच्या दिशेने (Wrong Side) आलेल्या ट्रकने कारला धडक (Truck-Car Accident) दिल्याने पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) रांजणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा (5 Death) जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रांजणगावजवळ झाला असून एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला असून ठार झालेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महामार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने कारला समोरुनच जोरदार धडक दिली, ही धडक इतकी भयानक होती की, कारमधील समोर बसलेले कारमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर घटनास्थळी क्रेन आणून कार आणि ट्रक वेगवेगळे करण्यात आले.
काही काळानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ट्रकची कारला बसलेली धडक इतकी भयानक होती की, कारच्या समोरील भाग आत गेला होता, त्यामुळे कारच्या समोर बसलेले आताच अडकून पडले होते.
ट्रक चुकीच्या दिशेने
पुणे-अहमदनगर महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला, चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने पनवेलकडे निघालेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली, ही धडक इतकी भयानक होती की, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
अहमदनगरातील आवाने बुद्रुकवर शोककळा
ठार झालेल्यां व्यक्तींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील व्यक्ती असून हा अपघात झाल्याचे गावात कळताच गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात झाल्याचे समजताच गावातील काही जण घटनास्थळाकडे रवाना झाले होते.
एकाच कुटुंबावर काळाचा घाला
पुण्याहून पनवेल निघालेल्या कारमध्ये सध्याच्या माहितीनुसार कारमध्ये सहा जण होते. रांजणगावाजवळ कार आली असता समोरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने या कारला उडवले आहे. ट्रकची कारला धडक बसताच कारमधील 5 जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसीमध्ये एलजी कंपनी आहे, त्यासमोर हा अपघात झाला त्यावेळी फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावावर आणि परिसरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.