सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

सोलापूर- पुणे महामार्गावर  टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला .

सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 6:46 AM

पुणे: सोलापूर- पुणे महामार्गावर  टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला . भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू आहे. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात  आले आहे.

रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर – पुणे महामार्गावर शनिवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. मळीने भरलेला ट्रँकर इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला होता. तर तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक सोलापूरकडून पुण्याकडे येत होता. भिमानगर परिसरातील एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. सोलापूर- पुणे महामार्गावर असलेल्या भीमा नदीच्या पुलावर इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टँकर चालकाचा ताबा सुटून वाहन प्रथम दुभाजकावर आदळले व नंतर ट्रक आणि टॅंकरची धड झाली.

दोन तास वाहतुकीचा खोळंबा 

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थाळाकडे धाव घेतली. स्थानिकाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची अद्याप ओळख समोर आलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने रोडच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.

संबंधित बातम्या 

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल; भुजबळांनी उडवली खिल्ली

मेट्रो मार्गिका-3 प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

अण्णाभाऊ साठे सभागृहातील लाऊड स्पिकर्स चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करा; झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.