Pune crime : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अकरा वर्षांच्या अल्पवयीन (Minor) मुलीला (Girl) पैशांचे आमिष दाखवून व जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक (Physical abuse) अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील एका वर्षापासून हा प्रकार होत आहे.

Pune crime : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:25 AM

दौंड (पुणे) : अकरा वर्षांच्या अल्पवयीन (Minor) मुलीला (Girl) पैशांचे आमिष दाखवून व जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार (Physical abuse) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील एका वर्षापासून हा प्रकार होत आहे. घरी कोण नसल्याचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील कानगावमध्ये घडली आहे. वीस रुपयांचे आमिष दाखवून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार हा नराधम करीत होता. याची माहिती मुलीच्या आई वडिलांना मिळाल्यानंतर आरोपीविरोधात पाटस पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या नराधमाला यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अटक केली आहे. विविध कलमांतर्गत या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मागील वर्षभरापासून हा प्रकार होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

POCSOसह विविध कलमे

पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मयूर पांडुरंग फडके असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. तो दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पाटस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तत्काळ आरोपी मयूर फडके यास अटक केली.

आरोपी पोलीस कोठडीत

आरोपी मयूर फडके याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी याविषयीची माहिती दिली.

आणखी वाचा :

Pune crime : Holiच्या पार्टीतून लांबवले तब्बल 21 Mobiles! Hadapsar पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, Pimpri Chinchwad शहरातल्या 78 मालमत्ता ‘सील’, 60 नळ कनेक्शनही तोडले!

Pune Crime | पुण्यात भामाआसखेड धरणात पोहण्यासाठी उतरले अन… , डोळ्यात देखत बुडाले ; मामे बहिणीसह भावाचा बुडून दुदैवी मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.