पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांचे कोडवर्ड शरबत, रोजवॉटर अन्…

pune isis module case | पुणे इसिस मॉड्यूल केसमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. दहशवादी उच्चशिक्षित होते. ते शरबत, रोजवॉटर कोडवर्डचा वापर करत होते. या कोडवर्डचा वापर करुन त्यांनी स्फोटकांसाठी लागणारे साहित्य जमवले होते.

पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांचे कोडवर्ड शरबत, रोजवॉटर अन्...
terrorist
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 10:58 AM

पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकणातील दहशतवादी उच्चशिक्षित आहेत. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. या प्रकरणातील आरोपी जुल्फीकार अली हा एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता, अशी माहिती आरोपपत्रातून एनआयएने दिली आहे. तसेच उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. त्याला स्फोटकांचे चांगले ज्ञान होते. त्याचा वापर करुन त्याने बॉम्बची निर्मिती केली, असे एनआयएने म्हटले आहे.

स्फोटके बनवण्यासाठी खरेदी

आरोपी कादीर पठाण पुणे येथे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. त्याने सोबत असणाऱ्या इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्स शिकवले होते. आरोपी आपली ओळख लपून राहावी म्हणून ग्राफिकची कामे करुन पैसे कमवत होते, असे एनआयएने म्हटले आहे. आरोपींनी आयईडी स्फोटक बनवण्यासाठी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या. ज्यामध्ये काही केमिकल्स होती. या केमिकल्ससाठी ते कोडवार्डचा वापर करत होते.

काय आहेत कोडवर्ड्स

सल्फरिक एसिडसाठी विनेगार हा कोडवर्ड दहशतवाद्यांनी ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोजवॉटर हा कोडवर्ड ठेवला होता. तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत हा कोडवर्ड होता. या प्रकरणातील आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. शिवाय आयईडी बॉम्ब बनवण्याच काम आरोपींकडून युद्धपातळीवर सुरु होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सात जणांवर आरोपपत्र

राष्ट्रीय तपास संस्थेने सात आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात मोहम्मद इमरान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काजी, जुल्फिकार अली, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन यांचा समवेश आहे. त्यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबईतील आहेत तर दोघे जण मध्य प्रदेशातील आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.