Pune News | पुणे शहरातून बांगलादेशात पैसे…केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आले…

Pune Crime News | पुणे शहरात केंद्रीय यंत्रणेकडून मोठी कारवाई केली गेली आहे. पुणे शहरातून बांगलादेशात पैसे पाठवण्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात घुसखोरी आणि विदेशात पैसे पाठवणे या कारणावरुन चौघांना अटक केलीय.

Pune News | पुणे शहरातून बांगलादेशात पैसे...केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आले...
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 1:51 PM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर आता संवेदनशील होऊ लागले आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी दहशतवादी साडले होते. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात सापडलेले दोन आरोपी दहशतवादी निघाले. हे दहशतवादी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉन्टेडच्या यादीत होते. त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. या प्रकरणात फरार तिसऱ्या दशतवाद्यास नवी दिल्लीत अटक झाली होती. हे प्रकरण ताजे असताना बांगलादेशी घुसखोर पुण्यात आहेत. या प्रकरणी पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केली आहे.

११ जणांवर गुन्हा दाखल अन्…

१५ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय तपास यंत्रणेने पुण्यात बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी अकरा बांगलादेशी नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी या सर्व जणांनी आपण बांगलादेशी असल्याचे मान्यही केले होते. परंतु पुणे पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते. कारण त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचा कोणताही पुरावा नव्हता, असे अजब कारण पोलिसांनी दिले.

केंद्रीय संस्थांनी दिले पुरावे

हडपसर पोलिसांनी त्या आरोपींना सोडून दिले होते. त्यानंतर केंद्रीय संस्थांनी पुणे शहरातील चार बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सबळ पुरावे जमा केले. या लोकांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्डही तयार केले. ही सर्व कागदपत्रे देणारे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सोडून दिलेल्या आरोपींपैकी चार जणांना पुन्हा अटक केली. या लोकांनी भारतात कमावलेले पैसे बेकायदेशीरपणे बांगलादेशात पाठवल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात अनेक बांगलादेशी

पुणे शहरात अनेक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतून काही बांगलादेशी मुलींना ताब्यात घेतले होते. त्या मुलींना त्वचेवर उपचार करण्याचे कारण सांगून भारतात बोलवले होते. त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी कुंटनखाना चालवणाऱ्यास अटक करण्यात आली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.