शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरु असताना हे काय घडलं? अमोल कोल्हे यांचे थेट पोलिसांवरच आरोप

प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग आज पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. पण या प्रयोगादरम्यान एक अनपेक्षित प्रकार घडला.

शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरु असताना हे काय घडलं? अमोल कोल्हे यांचे थेट पोलिसांवरच आरोप
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:02 PM

पिंपरी चिंचवड : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग आज पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. पण या प्रयोगादरम्यान एक अनपेक्षित प्रकार घडला. अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरु असताना अचानक पोलिसांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ उडाला. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी भर मंचावरुन पोलिसांवर गंभीर आरोप केले. शिवपुत्र संभाजी नाटकाचे पास दिले नाही तर याचे सादरीकरण कसे होते, हे बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं. अमोल कोल्हे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख केला.  त्यांना देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणाऱ्या पोलिसांना समज देण्याचं आवाहन केलं. वर्दी ही जबाबदारीची असते. याची जाणीव ठेवावी, असं अमोल कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं. अमोल कोल्हे यांच्या या आरोपांवरुन आता पोलिसांकडून काय भूमिका मांडण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

अमोल कोल्हे हे एका पक्षाचे खासदार आहेत. ते महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिल्लीतील लोकसभेत करतात. याशिवाय ते प्रसिद्ध नट आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या आत्मचरित्रावर केलेल्या मालिका या महाराष्ट्रासाठी अतिशय प्रेरणादायक आहेत. शिवरायांचा इतिहास त्यामुळे अनेकांना समजला. अनेक घरांपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला. शालेय विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेण्यात सोपा झाला.

याशिवाय कोल्हे यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. ते स्वत: पदाने डॉक्टर आहेत. याशिवाय ते आधी शिवसेना पक्षात होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत खासदारकीचं तिकीट मिळवलं. तसेच ते जिंकूनही आले. एवढ्या मोठ्या नेत्याला आणि अभिनेत्याला या अशा गोष्टींना सामोरं जावं लागणं हे अनपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे गांभीर्याने बघितलं जाणं जरुरीचं आहे, अशी चर्चा आता सुरु झालीय. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकारावर काय भूमिका मांडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दुखापतीतून सावरुन अमोल कोल्हे यांचा प्रयोग

काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांना शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एंट्री घेत असताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नाटकाच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एण्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.

अमोल कोल्हे यांना पाठीत कळ आल्याने तात्काळ घोड्यावरून उतरवण्यात आलं होतं. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधं घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला होता. त्या दुखापतीतून सावरुन अमोल कोल्हे पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पण आज त्यांनी जाहीरपणे पोलिसांच्या वागणुकीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.