Pune News | अदानी यांची पुण्यात गुंतवणूक, ‘पीएमपीएल’ होणार मालामाल, असा आहे प्रकल्प

Pune News PMPML | पुणे शहरासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. आता पीएमपीएमएलकडून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधले जात आहे. अदानी यांच्यासोबत पीएमपीएमएलने करार केला आहे.

Pune News | अदानी यांची पुण्यात गुंतवणूक, 'पीएमपीएल' होणार मालामाल, असा आहे प्रकल्प
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 1:59 PM

अभिजित पोते, पुणे, दि.19 जानेवारी 2024 | पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो दोन मार्गांवर सुरु झाली आहे. मेट्रोच्या वेळेत बसेस सोडण्याचा प्रयत्न पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) केला जात आहे. तसेच पीएमपीएमएल नवीन बदल करत आहे. पीएमपीएमएलने आपल्या ताफ्यातील डिझेल बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी नवीन इलेक्ट्रीक बसेस येणार आहेत. गुगलवर पीएमपीची बस सध्या कुठे आहे? हे कळणार आहे. हे सर्व करताना पीएमपीएमएलने उत्पन्न वाढीचे मार्ग शोधले आहे. आता उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीसोबत पीएमपीएमएलने करार केला आहे. त्याचा फायदा पीएमपीएमएल होणार असून उत्पन्न वाढणार आहे.

काय आहे पीएमपीएमएल अन् अदानी यांचा प्रकल्प

अदानी यांच्या कंपनीने पुण्यात गुंतवणूक केली आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडून नवीन मार्ग शोधण्यात आले आहेत. आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाकडून नवी गुंतवणूक केली आहे. पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून नवे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यातील एकूण 4 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात अदानी कंपनीकडून सुरुवात झाली आहे.

पीएमपीएमएलला असणार फायदा

अदानी आणि पीएमपीएमएल यांच्या करारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 32.5% वाटा पीएमपीएमएल प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे पीएमपीएमएल उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. पुणे शहरात अधिक चांगल्या सुविधी मंडळाकडून यानंतर मिळू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा

पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक बदल केले होते. त्यांनी चालक-वाहकांच्या बेशिस्त वर्तनाला चाप लावला होता. त्यासाठी ते स्वत: बसमधून प्रवास करत होते. पीएमपीएमएल’च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना न मागताच दिवाळी बोनस जाहीर केला होता. परंतु त्यानंतर त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी एस. जी. कोलते यांची नियुक्ती झाली. त्यांनीही बदल करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.