Aditya-L1 Sun Mission : पुणे शहरातील या मराठी शास्त्रज्ञाची आदित्य मिशनसाठी मोलाची कामगिरी, या ठिकाणी केले नेतृत्व

Pune Aditya-L1 Sun Mission News : आदित्य एल 1 म्हणजे सूर्याचा अभ्यास करण्याची ईस्त्रोची मोहीम सुरु झाली. या मोहिमेत पुणे शहरातील शास्त्रज्ञांचा महत्वाचा वाटा रहिला आहे. पुणे शहरातील शास्त्रज्ञ भास बापट यांनी एका विभागाचे नेतृत्व केले.

Aditya-L1 Sun Mission : पुणे शहरातील या मराठी शास्त्रज्ञाची आदित्य मिशनसाठी मोलाची कामगिरी, या ठिकाणी केले नेतृत्व
Prof. Bhas Bapat
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 10:14 AM

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) आदित्य एल-1 मिशनला शनिवारी सुरुवात केली. भारताचे आदित्य यान सूर्याकडे यशस्वीपणे झेपावले आणि श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर जल्लोष झाला. आदित्य यान जवळपास चार महिन्यांनी म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये इच्छित स्थळी पोहचणार आहे. या मोहिमेत पुणे शहरातील आयुकाचा सहभाग होता, तसेच पुणे शहरातील शास्त्रज्ञही होते. त्यातील भास बापट यांनी एका विभागाने नेतृत्व केले.

काय केले भास बापट यांनी

सौरवादळाच्या अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे तयार करण्याची जबाबदारी प्रो.भास बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भास बापट यांच्या टीमने प्रोटॉन आणि अल्फा कणांनी भारित असलेल्या सौरवादळांचा अभ्यास करणारे उपकरण तयार केले. सौर वादळांचा सुपर थर्मल आणि प्रभारीत कणांचा स्पेक्ट्रोमीटर तंत्रज्ञान यामध्ये आहे.

2013 मध्ये कल्पना, पूर्ण झाली 2020 मध्ये

सोलर विंड पार्टिकल एक्विस्परीमेंटची संकल्पना 2013 मध्ये मांडण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या परिश्रमानंतर 2020 मध्ये हे उपकरण तयार झाले. वेगवेगळ्या दिशांनी येणारे सौरकणाची माहिती एकाच यानाद्वारे मिळणार आहे. अहमदाबादमधील फिजिक्स रिसर्च लॅबरोटरीमध्ये असताना भास बापट यांनी ही कल्पना मांडली होती. त्यानंतर या उपकरण निर्मितीच्या टीमचे नेतृत्व त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात भास बापट

भास बापट यांनी आदित्य मिशनसंदर्भात बोलताना सांगितले की, आमचे लक्ष आता तीन महिन्यानंतर येणाऱ्या संदेशाकडे आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर आदित्य एल 1 पोहचल्यानंतर खऱ्या आर्थाने आनंद साजरा केला जाईल. आदित्य एल 1 कडून मिळणारी माहिती प्रारंभीच्या काळात भारतीय संशोधन संस्थांना दिली जाईल. त्यानंतर ती जगभरातील संशोधकांना दिली जाईल.

यांचाही होता सहभाग

पुणे आयुकामध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. आदित्य एल 1 साठी लागणाऱ्या पेलोडमध्ये सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप (SUIT) तयार करण्याची जबाबदारी इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्टोफिजिक्स म्हणजेच आयुकामधील शास्त्रज्ञांनी केली. त्यात दुर्गेश त्रिपाठी आणि ए.एन. रामप्रकाश यांचा सहभाग होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.