असे काय घडलं की वडिलांना करावी लागली १३ वर्षीय मुलीची हत्या, कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का
पुण्यातील पर्वतीजवळील जनता वसाहतमध्ये वृषाली शिंदे व संदीप शिंदे हे दाम्पत्य राहत होते. त्यांना १३ वर्षींची तनुश्री ही मुलगी होती. या मुलीच्या वडिलांचे आणि आईचे विभक्त होण्यासाठीचे वाद गेला काही महिन्यांपासून सुरू होता.
पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी आली आहे. बापाने आपल्या १३ वर्षीय लाडक्या मुलीची हत्या केली. त्याला कारण वेगळे आहे. या प्रकारामुळे संवेदनशील व्यक्तींना धक्का बसला आहे. नवरा-बायकोमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडण होत होते. त्या भांडणाचा राग बापाने मुलीवर काढला. मुलीचे जीवन संपले अन् बापही आपले जीवन संपवण्याच्या तयारीत होता. आता बाप रुग्णालयात दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस तपासानंतर मुलीच्या वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले
पुण्यातील पर्वतीजवळील जनता वसाहतमध्ये वृषाली शिंदे व संदीप शिंदे हे दाम्पत्य राहत होते. त्यांना १३ वर्षींची तनुश्री ही मुलगी होती.स्वारगेट पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या माहितीनुसार या मुलीच्या वडिलांचे आणि आईचे विभक्त होण्यासाठीचे वाद गेला काही महिन्यांपासून सुरू होता. त्यानंतर या मुलीच्या आजोबांनी तिच्या वडिलांना विभक्त होण्यासाठीची नोटीस देखील पाठवली होती.
यामुळे वडिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तनुश्रीला आपला बरोबर घरी आणले व पहाटे तीनच्या सुमारास हत्या करून जवळपास असणाऱ्या कॅनलमध्ये फेकून दिले.हत्या केलेल्या तनुश्री शिंदे हिचा शोध अग्निशामक दलाच्या जवानांकडून सकाळपासून घेतला जात आहे.पाच तासाहून अधिक वेळ अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू आहे मात्र अजूनही मुलीचा तपास लागलेला नाही.
स्वत: आत्महत्येचा प्रयत्न
संदीप शिंदे यांनी मुलीला कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर ते घरी आले. त्यांनी विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संदीप शिंदे यांच्यावर सध्या ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याबाबत मुलीच्या आईने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस तपासानंतर मुलीच्या वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
राग का येतो
- जेव्हाही आपल्याला अपेक्षित नसलेली एखादी गोष्ट घडते तेव्हा एक सिग्नल आपल्या मेंदूला जातो.
- हे सिग्नल अमिगडाला नावाच्या मेंदूच्या पेशीकडे जातात, त्यानंतर तणाव संप्रेरके एड्रेनालाईन आणि टेस्टोस्टेरॉन सोडतात.
- हे हार्मोन्स शरीराला रागासाठी तयार करतात.
- एखादी व्यक्ती रागावर कशी प्रतिक्रिया देते हे मेंदूच्या बाहेरील भागात ठरवले जाते, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात.
- या भागात घेतलेल्या निर्णयामुळे कधी कोणी रागाने कोणाला तरी मारतो तर कधी फक्त ओरडतो.