चोरटयांची चोरीची पद्धत बदलली, काही समजण्यापुर्वीच व्यापाऱ्याला क्षणात लुटले

पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी गोळीबार सुरु केला. या चोरट्यांनी कालेश्वर आगरिया व दीपक जगदाळे यांच्यांजवळ असणारी बॅग पळवण्याचा प्रयत्न केला.

चोरटयांची चोरीची पद्धत बदलली, काही समजण्यापुर्वीच व्यापाऱ्याला क्षणात लुटले
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 10:49 AM

विनय जगताप, भोर, पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी दिवसंदिवस वाढत आहे. पोलिसांच्या विविध उपाययोजनानंतरही गुन्हेगारी कमी होत नाही. सर्व सामान्यांप्रमाणे व्यापारी वर्गालाही त्याचा फटका बसत आहे. चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन पद्धत शोधत आहेत. आता चोरट्यांनी चोरीची पद्धत बदलली आहे. व्यापारी दुकान बंद करुन घरी जात असताना गोळीबार (firing in pune) करत लुटले. त्यासाठी चोरट्यांनी आधी रेकीही केली असणार आहे. या प्रकरणी 3 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.खेड शिवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

कशी घडली घटना

हे सुद्धा वाचा

खेड शिवापूर जवळ सोनल वाईन्स हे मद्यविक्रीची दुकान आहे. दुकानातील दिवसभर जमा झालेली 3 लाख 78 हजारांची रक्कम दुकानं बंद झाल्यावर व्यापारी कालेश्वर आगरिया आणि दीपक जगदाळे घरी नेत होते. त्यावेळी अचानक पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी गोळीबार सुरु केला. या चोरट्यांनी कालेश्वर आगरिया व दीपक जगदाळे यांच्यांजवळ असणारी बॅग पळवण्याचा प्रयत्न केला.

कालेश्वर यांनी विरोध केल्यानंतर चोरटयांनी पिस्तूलातून 2 गोळ्या फायर केल्या. त्यामुळे कालेश्वर यांनी हातातली बॅग सोडून दिली. त्यानंतर चोरट्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी खेडशिवापूर पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आणि कर्मचारी करत आहेत.

पुण्यात मागील महिन्यात दोन वेळा गोळीबार

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून बांधकाम व्यावसायिक संतोष पवार व रमेश बद्रीनाथ राठोड या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर संतोष पवार याने रमेश राठोडवर गोळीबार केला. या घटनेत रमेश यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले आहे.

विशेष म्हणजे घटना घडली त्या ठिकाणांवरुन सिंहगड रोड पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर जानेवारी महिन्यात घडली होती. संतोष पवार यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे. त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील असतो. त्याच दिवशी पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटीजवळ सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार झाला होता.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.