“जे विरोधात बोलतात, त्याला ईडीची नोटीस पाठवतात”; सत्ताधाऱ्यांच्या राजकारणावरून राष्ट्रवादीनं भाजपवर तोफ डागली

जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवतात असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. आमदार जयंत पाटील यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट आले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील 2 पुस्तके घेऊन गेले आहेत तिथे वाचायला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जे विरोधात बोलतात, त्याला ईडीची नोटीस पाठवतात; सत्ताधाऱ्यांच्या राजकारणावरून राष्ट्रवादीनं भाजपवर तोफ डागली
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 5:39 PM

दौंड : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर विरोधी गटातील अनेक नेत्यांवर ईडीकडून धाडसत्र चालू होती. त्यानंतर विरोधकांनीही सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. मागील वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीची नोटीस पाठवल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. तर आताही विरोधी गटातील नेत्याना आता पुन्हा एकदा ईडीचे नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनाही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच ईडीकडून नोटीस पाठवल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरूनच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, याबाबत माझं आणि आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर सकाळी बोलणे झाले, त्यामुळे हे अमच्यासाठी काहीच नवीन नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती, आणि त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींबद्दलही त्यांनी बोलून दाखवलं यावेळी त्या म्हणाल्या शरद पवारांनादेखील अशी नोटीस पाठवली होती त्यांनतर महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

हे दडपशाहीचे सरकार विरोधी पक्षातील लोकांना याच प्रकारची नोटीस पाठवत असतात. आधीची सरकारे होती त्यावेळी त्या स्वायत्त संस्था होत्या.तर आता मात्र अदृश्य हात आता या संस्था चालवतात असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवतात असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. आमदार जयंत पाटील यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट आले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील 2 पुस्तके घेऊन गेले आहेत तिथे वाचायला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचाही त्यांनी पाढा वाचला.

यावेळी त्या म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा धाड पडली आहे. तर नवाब मलिक जे नेहमी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत होते, त्यांनाही या सरकारने आता जेलमध्ये टाकले आहे. तर त्यांचे नेते म्हणतात की, आम्ही भाजपमध्ये गेल्यापासून आम्हाला आता शांत झोप लागते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.