Pune Real Estate | बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅट्सच्या संख्येत वाढ, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरांची मागणी वाढली

कोरोनामुळे (Corona) अनेक महिने मंदीचा सामना केल्यानंतर पुण्यातला रियल इस्टेट (Real Estate) उद्योग पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) मंदावलेली बांधकामं पुन्हा जोमात सुरू होत आहेत. त्यामुळे संपूर्ण उद्योगात सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय.

Pune Real Estate | बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅट्सच्या संख्येत वाढ, 'वर्क फ्रॉम होम'मुळे घरांची मागणी वाढली
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 5:34 PM

पुणे : कोरोनामुळे (Corona) अनेक महिने मंदीचा (Recession) सामना केल्यानंतर पुण्यातला रियल इस्टेट (Real Estate) उद्योग पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) मंदावलेली बांधकामं पुन्हा जोमात सुरू होत आहेत. त्यामुळे संपूर्ण उद्योगात सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बांधकाम सुरु असलेल्या फ्लॅट्सची गेल्यावर्षीच्या तुलनेत 26.3 टक्क्यांनी वाढली आहे. (After months of recession due to Corona, the real estate industry in Pune is recovering)

गेल्यावर्षीपेक्षा यंदा 26.3 टक्क्यांनी वाढले प्रकल्प

जानेवारी ते जून 2021 दरम्यान पुण्यात एकूण 12 हजार 558 फ्लॅट्स असलेले गृहप्रकल्पांचं बांधकाम सुरू झालं आहे. गेल्यावर्षी हा आकडा 9 हजार 944 होता. गेल्यावर्षी आणि यावर्षीची तुलना केली असता गेल्यावर्षीपेक्षा यंदा 26.3 टक्क्यांनी प्रकल्प वाढले आहेत.

यंदा बांधकामात वाढ झालेली असली तरी फ्लॅट्सच्या विक्रीमध्ये मात्र घट पहायला मिळत आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात पुण्यात 20 हजार 431 फ्लॅट्सची विक्री झाली होती. यावर्षी पहिल्या सहामाहीत 16 हजार 220 फ्लॅट्सची विक्री झाली आहे.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्या घरांच्या मागणीत वाढ

यावर्षी नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये २बीएचके असलेल्या घरांचं प्रमाण जास्त आहे. एकूण प्रकल्पांपैकी 72 टक्के घरं ही 2 बीएचके स्वरूपातली आहेत. त्यानंतर 3 बीएचके घरांचा वाटा जवळपास 19 टक्के आहे. वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे मोठ्या घरांच्या मागणीत वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ही मागणी लक्षात घेऊन विकासकांकडूनही मोठी घरं बांधण्याला प्राधान्य दिलं जात आहे.

स्वतःचं घर घेण्यासाठी खरेदीदारांमध्ये धडपड

कोरोनाकाळात स्वतःच्या मालकीच्या घरांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे स्वतःचं घर घेण्यासाठी खरेदीदारांमध्ये धडपड पहायला मिळत आहे. परवडणाऱ्या घरांचा मुद्दा बाजूला ठेवला तर स्वतःच्या मालकीचं घर घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. शहरात नव्यानं बांधकाम सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये फ्लॅट्सची किंमत 45 लाखांपासून ते 75 लाखांपर्यंत आहे. अशा फ्लॅट्सची संख्या जवळजवळ 62 टक्के आहे. तर 45 लाखांहून कमी किंमत असलेल्या फ्लॅट्सची संख्या 25 टक्के एवढी आहे.

संबंधित बातम्या :

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याला झळाळी, एका दिवसांत 190 रुपयांनी वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे दर

पुण्याच्या पाणी कोट्यात वाढ, 23 समाविष्ठ गावांचा 1.75 टीएमसी कोटा महापालिकेकडे वर्ग

नावात बरंच काही आहे! सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर ते बटाट्या मारूती, पुणेकरांनी देवांना अशी नावं का दिली हे माहितीय का?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.