पुणेकरांना वाहतुकीची आणखी एक भेट, मेट्रोनंतर निओ प्रकल्पासाठी हालचाली
पुणे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पुणे शहर चारही बाजूने वाढत आहे. यामुळे वाहने वाढली आहे. परंतु पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था वाढली नाही. आता सर्वाजनिक वाहतूक बळकट करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पुण्यातील निओ प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा मागवण्यात आल्या.
पुणे : पुणे शहरात वाहने वाढली आहे. परंतु शहरातील रस्ते वाढू शकत नाही. यामुळे खासगी वाहनांच्या वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्याचा प्रकल्प सुरु आहे. पुणे शहरात शहर वाहतूक बससेवा आहे. त्यानंतर आता मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचे काही प्रकल्पही लवकरच पुर्ण होणार आहे. परंतु अजून एका वाहतूक सुविधेची भेट पुणेकरांना मिळणार आहे. मेट्रोप्रमाणे निओ प्रकल्प पुणे शहरात तयार केला जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत.
किती लांबीचा असणार मार्ग
पुणे शहरात मेट्रोचे काम करणाऱ्या महामेट्रो कंपनीने निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. महामेट्रोने हा आराखडा महापालिकेला सादर केला आहे. आता लवकरच मनपा अधिकारी जागेची पाहणी करणार आहे. सुमारे 44 कि.मी. लांबीच्या एचसीएमटीआर या एलिव्हेटेड वर्तुळाकार या प्रकल्पावर 1986 पासून चर्चा होत होती. परंतु आता हालचाली सुरु झाल्या आहेत.
किती कोटींचा प्रकल्प
पुणे शहरातील निओ प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा मागवण्यात आल्या. 5 हजार 192 कोटी रुपयांच्या या निविदा आहेत. हा निधी उभारण्यासाठी केंद्र शासनाची मदत मिळेल, असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकात्मक पद्धतीने निओ मेट्रो प्रकल्पाची गरज व्यक्त केली होती.
मेट्रो मार्गाला जोडणार
निओ मेट्रो प्रकल्प मेट्रो मार्गाला जोडण्यात येणार आहे. आठ ठिकाणी दोन्ही मार्ग एकत्र केले जाणार आहे. बोपोडीपासून सुरू होणारा मार्ग विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, कोथरूड, एरंडवणे, म्हात्रे पूल, सिंहगड रस्ता, सारसबाग, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी, कोंढवा-एन आयबीएम रोड, वानवडी, एम्प्रेस गार्डन, मुंढवा, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, खडकी बाजार आदी भागांतून जाणार आहे.
पुणे मेट्रोची वनाज ते रामवाडी हे 14.66 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही 16.59 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत. 6 मार्चला या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन झालं.
मेट्रो मार्ग
वनाज ते चांदणी चौक – १.५ किमी रामवाडी ते वाघोली – १२ किमी हडपसर ते खराडी – ५ किमी स्वारगेट ते हडपसर – ७ किमी खडकवासला ते स्वारगेट – ८ किमी एसएनडीटी ते वारजे – १३ किमी एचसीएमटीआर मार्ग – ३६ किमी