राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर हे बाप-बेटे आले चर्चेत, कशी सुरु आहे रणनीती

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले. त्यानंतर शरद पवार मैदानात उतरले आहे. त्यांनी पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी एक बाप-बेटे चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर हे बाप-बेटे आले चर्चेत, कशी सुरु आहे रणनीती
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:02 PM

गिरीश गायकवाड, कराड : राज्यातील राजकारणात अजित पवार यांनी मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी आपला वेगळा गट तयार केला. या गटातील नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. अजित पवार यांच्यांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहे. त्यांनी स्वत: सर्वच आमदारांना फोन करुन त्यांच्यांशी चर्चा केली आहे. पुन्हा आपण जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. दोन पवारांमधील या वॉरमध्ये एक बाप-बेटीची जोडी चर्चेत आली आहे. अर्थात ही जोडी शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे.

शरद पवारांचे शक्तीप्रदर्शन अन् पक्षासाठी बाप बेटे मैदानात

राज्यात रविवारी झालेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी कराडमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले. पक्षाच्या या संघर्षाच्या काळात पक्षासाठी बाप-बेटे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. एक जण मुंबईतून मैदानात होता तर दुसरा जण कराडमध्ये शरद पवार यांच्यासोबत होता. ही जोडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् त्यांचे पुत्र प्रतीक पाटील.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटील मुंबईत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी घडलेल्या घडामोडीनंतर मुंबईत आहेत. ते मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. मुंबई येथे थांबून ते सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत. मुंबईतून राजकीय व्यूहरचना ते करत आहे.

कायदेशीर बाबी पूर्ण करत आहेत. त्या़वेळी त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार, आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.

हे ही वाचा

पुणे खेडचे आमदार कोणासोबत? अजित पवार की शरद पवार?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.