दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधित, अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
पुण्यात 75 तास लसीकरण करणार
पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. 75 तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एक लाख सिरींज पुणे शहरात सिरींज घेण्यात आली आहेत. आम्ही ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत, असं पवार यांनी स्पष्ट केलं. पुणे महापालिकेत 2.1 कोरोनाबधित रेट आहे. कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे. पुण्यातील मृत्युदर 2.1 आला आहे. पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सक्रीय रुग्ण घटले
पुण्यात मागील आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. नागरिक दुसरा डोस घेततयानंतर नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, अशा कानपिचक्या अजित पवार यांनी पुणेकरांना दिल्या आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांमध्ये 19 टक्के घट झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करावी. प्रशासनाला नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेश देण्यात आे आहेत.
मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता नाही
राज्यात आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत.शाळांमधून कोविड प्रोटोकॉल सांगण्यात यावा. शाळा 4 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पालक अजून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही, दिवळींनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत.
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय. हे खरं आहे पण अजून निर्णय झालेला नाही जलयुक्त शनिवार योजनेमुळेच एवढा पूर आलाय का? अशी शंका तज्ज्ञांनी उपस्थित केलीय हे खरं आहे त्याचाही अभ्यास करू, असं अजित पवार म्हणाले. नुकसान भरपाई देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असंही अजित पवार म्हणाले. मोठा भाग पूरग्रस्त बनलाय, पीकविमा संबंधित विमा कंपन्यांना सूचना दिल्यात आहेत. पाऊस पडत होता तेव्हा मंत्री मराठवाड्यातच होते. मंत्री फिरकले नाहीत हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या:
Ajijt Pawar said those who complete corona vaccine second dose violate corona rules