Ajit Pawar : “मी ड्रायव्हर, शरद पवार कंडक्टर, सुप्रिया सुळेंना सांगतो तिकीट काढ”, अजित पवारांनी पुन्हा कार्यकर्त्यांना सुनावलं

बारामती तालुक्यातील विकासाबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी असे एका कार्यकर्त्यांनी सांगितले असता अजित पवार यांनी तोच धागा पकडत. होय बाबा सगळी सगळी सोय करायची. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो ,पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला म्हणतो तू तिकीट काढ, असे म्हणाले.

Ajit Pawar : मी ड्रायव्हर, शरद पवार कंडक्टर, सुप्रिया सुळेंना सांगतो तिकीट काढ, अजित पवारांनी पुन्हा कार्यकर्त्यांना सुनावलं
अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 6:33 PM

पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) आजपर्यंत महाराष्ट्राने धडाडीने बोलणारा नेता म्हणून पाहिलं आहे. हेच अजित पवार भर सभेत कार्यकर्त्यांना सुनावतात. तर कधी विरोधकांना थेट भरल्या सभेतून आव्हान देतात. त्याची काही उदाहरण महाराष्ट्राने आधीच पाहिली आहेत. आज पुन्हा अजित पवारांचं हेच रुप कार्यकर्त्यांना बघायला मिळालं आहे. मी ड्रायव्हर होतो, शरद पवार साहेबांना (Sharad Pawar) कंडक्टकर करतो आणि सुप्रियाला (Supriya Sule) सांगतो तिकीट काढ म्हणत कार्यकर्त्यांची शाळा घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भिलारवाडीत आयोजित कार्यक्रमात बारामती तालुक्यातील विकासाबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी असे एका कार्यकर्त्यांनी सांगितले असता अजित पवार यांनी तोच धागा पकडत. होय बाबा सगळी सगळी सोय करायची. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो ,पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला म्हणतो तू तिकीट काढ, असे म्हणाले.

पूर्वीचा काळ आठवा

तसेच ते कार्यकर्त्यांना सुनावताना, पुढे म्हणाले, असे करू नका पूर्वीचा काळ आठवा. आपल्यात देखील बदल करा असे म्हणत त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उपस्थित भिलारवाडीच्या सभेमधील बारामतीकरांना सुनावत जांभळाच्या झाडाखाली बसून जांभूळ थोबाडात पडले पाहिजे याचे उदाहरण दिले. अजित पवारांच्या सभेत कार्यकर्त्यांनी मागण्यांची यादीच अजित पवारांसमोर ठेवली होती. ती काम अजित पवार एकापाठोपाठ वाचून दाखवत होते. मात्र कार्यकर्त्यांच्या मागण्या काही केल्या संपत नव्हत्या. त्यावेळी अजित पवारांनी पुन्हा कार्यकर्त्यांची शाळा घेतली आहे. अजित पवारांचं हे रुप पाहण्याची कार्यकर्त्यांची पहिली वेळ नसली तरी अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर काही काळ कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकल्याचे दिसून आले.

झाकली मुठ सव्वा लाखाची

तसेच त्यांनी बारामतीच्या विकास कामावरून आणि निधीवरूनही जोरदार फटकेबाजी केली आहे. बारामतीच्या विकास कामाबाबत किती पैसे आले हे मी सांगणार नाही. कारण हे चैनलवाले लगेच बारामतीत कसं चाललंय हे सगळीकडेच दाखवतील. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत चालावं असे म्हणताच एका कार्यकर्त्यांनी परत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एवढा निधी आला आहे असे सांगताना, त्याला थांबवत तू बोलू नकोस शहाण्या, आपली झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणत बारामती काय पण जिल्ह्याला राज्याला देखील निधी मिळावा आणि विकास कामे व्हावीत असे सांगत बारामतीत होत असलेल्या विकास कामाबाबत स्पष्टीकरण दिलेय, बारामती तालुक्यातील विकास कामांच्या पाहणी दरम्यान ते गावकऱ्यांशी बोलत होते.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.