Ajit Pawar : इतकी विकास कामं करुनही… बारामतीच्या पराभवावर अजितदादांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य
Ajit Pawar On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात डबल इंजिन सरकार असताना सुद्धा बारामतीत पराभवाचा सामना करावा लागल्याची खंत अजितदादांनी व्यक्त केली. सध्या अजितदादांचे वक्तव्य राज्यात चर्चेत आहेत. त्यात या वक्तव्याची भर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात टफ फाईट झाली. पवार कुटुंबियातच सामना रंगला. सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांच्यातील हा सामना देशभरता चर्चेचा विषय ठरला. यामध्ये अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्याची खंत दादांनी अखेर व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दादांची वक्तव्य एकदम चर्चेत आली आहे. काल त्यांनी कुटुंब फुटण्यावर भूमिका जाहीर केली आणि ती आपली चूक होती हे सांगितले. दादा रोखठोक बोलतात. त्यांनी आता विकास कामांवरुन बारामतीकरांच्या थेट हृदयालाच हात घातला आहे. काय म्हणाले दादा?
पिकतं तिथं उगवत नाही
पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मिसरूड आमदार मिळाला पाहिजे. १९९१ ते २०२४च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. करोडो रुपयाच्या. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे बघा. काही राहिले. मान्य करतो. कसे करायचे ते बघू. न मागता मेडिकल कॉलेज मिळतं. अहिल्यादेवीचं नाव मेडिकल कॉलेजला देणार आहोत. आयुर्वेदिक कॉलेज तयार करतो.
मध्ये केशवराव जगताप आले. म्हणाले मला शिक्षण संस्थेतील रस्त्यावरचे डांबरीकरण करून द्या. एक रुपया न घेता आम्ही रस्त्याचं डांबरीकरण करून दिलं. या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालताना काय अवस्था होती. आता सर्व कामे होत आहे. आपल्या तालुक्यात लखपती दीदी जास्त कशा होतील हे पाहणार आहोत. भाषण करून आर्थिक उन्नती होत नाही. अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही. त्यासाठी विकास कामं करावी लागतात याकडेत त्यांनी लक्ष वेधले.
विकास कामं करुनही पराभव
इतकी विकासाची कामे करूनही बारामतीत हरलो. कामं करूनही पराभव झाला, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का. आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अर्थसंकल्पात मी लिहिलं आहे. बारामतीत माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का? असा रोकडा सवाल त्यांनी बारामतीकरांना विचारला. विधानसभेपूर्वी दादांच्या या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.