अमित शाह यांच्या दौऱ्याला जाणं मुद्दाम टाळलं का?; अजित पवार काय म्हणाले?

मी कामाचा माणूस आहे. मुस्लिम आरक्षणासाठी मी आढावा बैठक घेतलेली होती. या चर्चेत त्यांनाही न्याय दिला गेला पाहिजे म्हणून काही निर्णय घेतले. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

अमित शाह यांच्या दौऱ्याला जाणं मुद्दाम टाळलं का?; अजित पवार काय म्हणाले?
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 12:05 PM

रणजित जाधव, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड | 24 सप्टेंबर 2023 : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील लालबागचा राजासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शाह, शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठकही झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. शाह काल दिवसभर मुंबईत होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अजितदादांनी शाह यांचा दौरा टाळल्याची चर्चा सुरू झाली. आता या सर्व चर्चांवर स्वत: अजित पवार यांनीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याला का नव्हतो याची सविस्तर माहिती दिली आणि या विषयला पूर्णविराम लगावला. काल दिवसभर मी बारामतीतहोतो, आज पिंपरीत आणि उद्या पुणे शहरात दिवसभर असणार आहे. बारामतीचे नेतृत्व करतोय तेव्हापासून मी वर्षानुवर्षे त्या पाच संस्थांच्या बैठकांना जात असतो. ते नियोजन 15 दिवसांपूर्वी ठरलेला होता. त्या संस्थांची वार्षिक मिटिंग होती. तिला जाणं आवश्यक होतं. वर्षातून एकदाच ही मिटिंग होत असते. त्याबाबत मी तसं वरिष्ठांना कळवलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तोपर्यंत दिवा स्वप्नच

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना नाव न घेता अप्रत्यक्ष सल्लाही दिला. आता कोणीच शिल्लक राहणार नाही. सगळेच भावी मुख्यमंत्री म्हणून आपापले फ्लेक्स लावतील, असा चिमटा त्यांनी काढला.

मी मागेच म्हणालो होतो, असे फ्लेक्स लावून काही होत नाही. कोणी कोणाचे बोर्ड लावायचे याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र जोपर्यंत जो कोणी 145 ही मॅजिक फिगर गाठत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्रीपद हे दिवा स्वप्नच राहील, असा सल्लाही त्यांनी दिला.

फक्त काम एके काम

145 ची मॅजिक फिगर गाठण्याचे दिवा स्वप्न तुम्ही पूर्ण कराल का? असा सवाल अजितदादांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी तात्काळ उत्तर दिलं. माझं काम सुरू आहे. मला 1991मध्ये पहिल्यांदा या शहराने खासदार केलं होतं. तेव्हापासूनच मी काम करत आहे. काम करणं हेच माझं ध्येय आहे. त्याशिवाय काही नाही. मी फक्त काम एके काम करतो. दुसरं काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं

आरक्षण कायद्याच्या चौकटीतच

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. अनेक मंत्र्यांनी आणि आमदार, खासदार आणि नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण दिलं जाईल. पण इतर समाजांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. जरांगे पाटील यांना त्याबाबत सरकारने आश्वासन दिलं आहे, असंही ते म्हणाले.

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.