ऑक्सिजन प्लँटची वेळोवेळी तपासणी करा, जादा बिल घेणाऱ्यांवर कारवाई करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही सर्व दक्षता घेत नियमांचे पालन करावे, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय.

ऑक्सिजन प्लँटची वेळोवेळी तपासणी करा, जादा बिल घेणाऱ्यांवर कारवाई करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 5:11 AM

पुणे : “पुणे पिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असं असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही सर्व दक्षता घेत नियमांचे पालन करावे,” असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते (Ajit Pawar comment on oxygen plant high bills by hospitals amid corona pandemic).

पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

“पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.”

तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही, असंही नमूद केलं. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह ग्रामीण भागात गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे. ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सार्वजनिक समारंभाला गर्दी करू नये, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचनाही दिल्या. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

“कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या”

“जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँटची वेळोवेळी तपासणी करून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावा, कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा,” असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही महत्वाचे विषय मांडले.

डॉ. सुभाष साळुंके यांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुर्लक्ष करून चालणार नाही, प्रत्येकाने दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे.

प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी – चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

ठाकरे सरकारनं शब्द पाळला, रिक्षा चालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात

वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा वारू उधळला, आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत; राऊतांचा इशारा

व्हिडीओ पाहा : 

Ajit Pawar comment on oxygen plant high bills by hospitals amid corona pandemic

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.