Ajit Pawar : अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह; प्रकृती चांगली असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन
माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी (Corona test) करून घ्यावी, असे अजित पवार यांनी आवाहन केले आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. त्याच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी (Corona test) करून घ्यावी, असे अजित पवार यांनी आवाहन केले आहे.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
हे सुद्धा वाचा— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
राज्यपालांनाही नुकताच झाला होता संसर्ग
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अँटिजेन टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. मात्र आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांनीच जागरूक राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे.
रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाला. जून महिन्यात कोरोनाने 33 जवळपास जणांचा बळी घेतला. यापैकी बहुतेक वृद्ध लोक होते किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा हृदयाच्या समस्या होत्या, असे बीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले. मुंबईसह, पुणे आणि ठाण्यामध्येही कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे निर्बंध नाहीत. मात्र, मागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरण्यासह इतर बाबींची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.