पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट…शरद पवार स्पष्टच बोलले…”तर मला…”

Baramati Diwali Padwa : राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यात या योजनाचे काय होणार? हे स्पष्ट होईल.

पवार कुटुंबियांमध्ये दिवाळी पाडव्यातील फूट...शरद पवार स्पष्टच बोलले...''तर मला...''
शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 6:46 AM

Baramati Diwali Padwa : एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबियांची अनेक वर्षांची परंपरा आहे. पाडवा गोविंद बागेत साजरा केला जातो. ती पद्धत कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. अजित पवार सोडले असता तर बाकी सर्व गोविंद बागेत आले होते. त्यांच्या भगिनी होत्या. त्यांचे बंधू असतातच. अजित पवार यांना वेळ मिळाला नसले. पण बाकीचे सर्व आले, असे शरद पवार यांनी शनिवारी बोलताना सांगितले. बारामतीमध्ये नेहमी पवार कुटुंबियांची एकत्र दिवाळी गोविंद बागेत साजरी होत होती. परंतु यंदा प्रथमच शरद पवार यांची दिवाळी गोविंद बागेत तर अजित पवार यांची दिवाळी काटेवाडीत साजरी झाली. त्यावर शरद पवार बोलत होते. 1967 सालापासून पवार कुटुंबीय बारामतीत एकत्र दिवाळी साजरी करतात.

राज्यातील परिस्थिती गंभीर

राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यात या योजनाचे काय होणार? हे स्पष्ट होईल. एखादा व्यक्ती गेल्यानंतर नऊ वर्षांनी त्यांच्यासंदर्भात बोलणे चुकीचे आहे. आर.आर.पाटील स्वच्छ राजकारणी म्हणून राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. आर.आर. पाटील यांच्यासंदर्भात असे काही घडायला नको होते. परंतु सत्ता असले की अशा पद्धतीने वापर केला जातो. काहीही बोलायला मोकळे होतात.

राज्य पहिल्या पाचमध्ये नाही

पाडव्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील जनतेला चांगले दिवस यावेत त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, त्यांच्या समस्यांची सुटका व्हावी अशी अपेक्षा आहे. मला स्वतला राज्याच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळण्यात राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या मंत्रालयाने रँकिंग केलं आहे. जे राज्य पहिल्या नंबरवर होतं त्याचा नंबर पहिल्या पाचमध्ये नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

उत्पन्नात काही बाबतीत महाराष्ट्राला धक्का बसला आहे. हे केंद्र सरकार सांगत आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. संपूर्ण बदल करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, त्यांना लोकांनी बळ दिलं पाहिजे. आज महाविकास आघाडी हा पर्याय आहे. महाविकास आघाडीच्या सामुदायिक परिवर्तनाने आपण परिवर्तन आणू शकतो आणि चित्र बदलू शकतो. आज पाडव्याच्या दिवशी हाच निर्धार करायचा की परिवर्तन करायचं आणि राज्याला चांगल्या मार्गावर आणायचं. लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.