आता माझं वय झालं नाही तर… अजितदादा यांच्या मिश्किल टिप्पणीने खसखस

राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं. धनगर समाजाला वाटतं आरक्षण मिळावं. ओबीसी समाजालाही वाटतं आरक्षण मिळावं. आम्ही मुंबईला येतोय. थांबायला तयार नाही, असं काहींनी सांगितलं आहे. तुम्ही या. सरकारच सगळ्यांच्या बाबतीत काम करत आहे. कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळेच थोडा वेळ लागत आहे, असं अजित पवार म्हणाले.

आता माझं वय झालं नाही तर... अजितदादा यांच्या मिश्किल टिप्पणीने खसखस
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 6:58 PM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 24 डिसेंबर 2023 : मी पहाटे लवकर उठून काम करतो. तरीही वेळ पुरत नाही. आज पहाटे 6 वाजता उठलो. एक कार्यकर्ता कागद घेऊन आला. आमदार झोपलेले असतील. तेव्हा माझ्याकडे लोक काम घेऊन येतात. आज एक महिला भगिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली, दादा खराडवाडीत कॉलेज काढा. मी म्हणालो, खराडवाडीत कॉलेज कसं निघणार? इतकं छोटं गाव आहे. इतकी छोटी खेराडवाडी. मुलं-मुली आणायची कुठून? तर ती म्हणाली, दादा तीही तुम्हीच आणा. आयला म्हटलं माझं वय झालं नाही तर मी आणलीच असती, असं मिश्किल विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.

अजितदादा गटाचा बारामतीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचाचा अजितदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी हे मिश्किल भाष्य केलं. आता इथून पुढे फक्त माझंच ऐका. बाकी कुणाचं ऐकायच नाही. बाकीच्यांच लय वर्ष तुम्ही ऐकलं. आता माझं ऐका. बऱ्याच जणांनीही त्यांचं ऐकलं. आम्ही वरिष्ठांना अनेकदा सांगितलं की, आजपर्यंत आम्ही तुम्ही म्हणाल तसं वागलो. तुम्ही सांगाल ती कामे केली. आता वय झालं. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.

बारामतीकरांचा आशीर्वाद

बारामतीकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठी आहात. तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही. मी माझं काम चोख करेन. कुणालाही काही कमी पडणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेत आहे. जर मी आज सत्तेत नसतो तर कामे करायला जमलं असतं का? मला तुम्हची सांगा, असं ते म्हणाले.

मोदींसारखा नेता नाही

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उंचीचा नेता देशात नाही. तुम्ही मल्लिकार्जुन खरगे आणि नरेंद्र मोदी यांना एकत्रित उभं करा. मला सांगा पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला मतदान करणार? असा सवाल करत अजितदादांनी मल्लिकार्जुन खरगे यांची खिल्ली उडवली.

बाकी पक्ष मागेच राहिले

राज्यात कसा कौल लागला हे आपण पाहिले आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. पण नंतर निवडून आलेले सरपंच पक्ष आणि नेते सांगतात. पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी पक्ष आला, तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला पक्ष आला. बाकीचे पक्ष मागे राहिले, असा टोला त्यांनी लगावला.

आईचंही नाव लावणार

आपण महिलांना संधी देत आहोत. आपण चौथ महिला धोरण आणलं. अदिती तटकरेने ते सादर केलं. मूल जन्माला आले की त्याला वडिलांचं नाव दिलं जातं. त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं लावण्याची प्रथा आहे. पण आता इथून पुढे मुलाचं नाव, त्यानंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव लावलं जाणार आहे. तसा निर्णयच आपण घेतला आहे. महिलांच्या नावावर घर घेतले तर पैसे वाचतील. टॅक्स कमी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.