Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुप्तगू, अजित पवार यांनी भर सभेत आतली बातमी सांगितली

अजित पवार यांची आज भोरमध्ये जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली? याबाबतची आतली बातमी सांगितली. यावेळी त्यांनी भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावरही टीका केली.

पुण्यात नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुप्तगू, अजित पवार यांनी भर सभेत आतली बातमी सांगितली
अजित पवार आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 8:37 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भोरमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? याबाबतची माहिती जाहीर सभेत दिली. “विधानसभा निवडणुकीसाठी उद्या प्रचार संपणार असल्याने 6-6 सभा घ्यायला लागतायत. पुढं काही सभा करायच्या आहेत. मी भोर, राजगड, मुळशीतील नागरिकांना अनेकवेळा सांगितलंय. बदल करा. लोकसभेला मी आवाहन केलं. पण तुम्ही साथ दिली? माझ्या बारामतीनेच मला नाकारलं म्हणून मी तुम्हाला कुठल्या तोंडाने विचारणार? लोकसभेला विरोधी पक्षाने वाटेल तसा खोटा मुद्दा लावून धरला. मला भोर मतदारसंघात आल्यावर लाज वाटते, विकास झालेला नाही. कायं इथले रस्ते, कायं इथलं बसस्थानक, राजगड करखाण्याची काय अवस्था आहे? तुम्हाला माझं साष्टांग दंडवत. कस कायं तुमची एवढी सहनशीलता?”, असं म्हणत अजित पवार यांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. “तुम्ही परत जाऊन त्यालाच बटन दाबून मतदान करताय. विकास नाही केला तरी तुम्ही त्यालाच मतदान करताय आणि त्याला पण बरं वाटतय. काँग्रेसचे सरकार असतानाही काही कामे करता आले नाहीत”, अशी टीका अजित पवारांनी केली.

नरेंद्र मोदींना अजित पवारांना काय सांगितलं?

“त्यांनी काही कामं केली नाहीत. पण आम्ही आमचं सरकार आल्यावर निधी दिलाय. लोकं आपली स्थलांतर करतायत, आपलं नेतृत्व काय? वा भोरकर. पहिल्या नंबरला शंकर मांडेकर यांचं नावं आहे. त्याला निवडून भोरचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं कामं माझं. एमआयडीसी दूरच, इथले आलेले कारखाने गेले. आज महाराष्ट्रमध्ये सरकार आल्यावर आम्ही केंद्र सरकारकडून काही निधी आणू शकतो. लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे, ती आपल्याला चालू ठेवायची आहे. पुण्यातल्या सभेत माझं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं आपल्याला पुण्यात अजून विकासकामे करायची आहेत. मी निधी देतो तुम्ही कमी पडू नका”, अशी आतली बातमी अजित पवारांनी आपल्या भाषणात दिली.

अजित पवारांचं मतदारांना आवाहन काय?

“स्वतःचं सरकार असताना सव्वा रुपया दिला आहे आणि आता आम्ही देतोय तर टीका करताय. 20 तारखेला कोण आपल्या कामाचा आहे? याचा विचार करून शंकरला संधी द्या. संग्राम थोपटे यांनी 15 वर्षात जी कामं केली असतील त्याची बेरीज करा आणि जेवढं येईल त्याच्या पेक्षा जास्त निधी मी या पंचवार्षिकमध्ये मतदारसंघाला देईन, निवडून द्या”, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी मतदारांना केलं.

हे सुद्धा वाचा

“आज मला भोरमध्ये आल्यावर खरोखर वाईट वाटलं. काय ती भोरची अवस्था, कायं ती धूळ. याआधी तुम्ही आमदाराला मतं दिली, खासदाराला दिली, त्यांची कामे तुमच्यापुढे आहेत. महाराज म्हणत असतील ही भोरची अवस्था मला बघवत नाही. पण तुम्हाला कशी बघवते. मी येऊन बेंबीच्या देठापासून सांगतोय, सुधारा.. सुधारा.. सुधारा.. पण तुमचं येरे माझ्या मागल्या. पुणे जिल्ह्यातील सर्वात मागे राहिलेले भोर, वेल्हा हे तालुके आहेत. बाकीचे आमदार येऊन मतदारसंघात विकासासाठी येऊन भांडतात. पण काँग्रेसची सत्ता असतानाही हे विकास करू शकले नाहीत. सगळी धरणं आपल्या उशाशी आहेत. पण 15 – 15 वर्ष देऊनही इथल्या लोकंप्रतिनिधीला ते प्रश्न सोडवता येत नाहीत”, अशी टीका अजित पवारांनी केली. तसेच “महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना निवडून द्या”, असंदेखील आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.