Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत, ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात

accident news: अजित पवार यांनी तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत रामभाऊ तावरे यांना बसवले. सोबत आपल्या काही लोकांना दवाखान्यात पाठवले. दवाखान्यात डॉक्टरांना सूचनाही दिल्या. या अपघातात तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे.

ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत, ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात
अपघातग्रस्ताला मदत करताना अजित पवार
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 12:19 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या धडाकेबाज कामांमुळे ओळखले जातात. सकाळी सहा वाजता ते दौऱ्यावर असतात. मग एखादे काम न झाल्यास ते अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. काम होणार नसले तर कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगतात. कोणाची मुलाहिजा न बाळगणारे अजित पवार तितकेच संवेदनशीलसुद्धा आहेत. शनिवारी एका घटनेनंतर ते पुन्हा स्पष्ट झाले. बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तो अपघात पहिल्यानंतर क्षणात त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार खाली उतरले. त्यांनी जखमी झालेल्या मदत सुरु केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात फोन करुन उपचाराबाबत सूचनाही दिल्या.

कसा झाला अपघात

सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातानंतर तावरे खाली पडले. त्यावेळी त्या अपघातस्थळावरुन कन्हेरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. ते स्वत: गाडीतून खाली उतरले. जखमी व्यक्तीला ताफ्यातील लोकांसोबत मदत करु लागले. जखमी व्यक्तीला पाहताच ते म्हणाले, हे तर रामभाऊ.

हे सुद्धा वाचा

ajit pawar

ताफ्यातील गाडीत बसवून पाठवले रुग्णालयात

अजित पवार यांनी तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत रामभाऊ तावरे यांना बसवले. सोबत आपल्या काही लोकांना दवाखान्यात पाठवले. दवाखान्यात डॉक्टरांना सूचनाही दिल्या. या अपघातात तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजित पवार यांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना त्यांनी पुढील दौऱ्याकडे न पाहता मदत कार्य केले. तावरे यांना रुग्णालयात पाठवल्यावर त्यांच्या पत्नीला काळजीचे काही कारण नाही, असं सांगत दिलासा दिला.

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.