सात आमदारांसोबत गायब झाल्याची चर्चा; 17 तासानंतर ‘नॉट रिचेबल’ अजित पवार अवतरले; एवढा तास कुठे होते?

| Updated on: Apr 08, 2023 | 9:32 AM

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक गायब झाल्यानंतर आज 17 तासानंतर प्रकटले आहे. एका शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजितदादा समोर आले आहेत.

सात आमदारांसोबत गायब झाल्याची चर्चा; 17 तासानंतर नॉट रिचेबल अजित पवार अवतरले; एवढा तास कुठे होते?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्यासोबत सात आमदार असल्याच्या चर्चाही होत्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत आहेत की काय अशी चर्चा होती. या सर्व चर्चांना अजित पवार यांनीच खोटे ठरवले आहे. तब्बल 17 तासानंतर अजित पवार प्रकटले. पुण्यातील एका कार्यक्रमाला त्यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यामुळे अजित पवार यांनी बंड केले नसून ते पुण्यात किंवा मुंबईतच असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या 17 तासात अजितदादा होते कुठे? हा प्रश्न कयम आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत सकाळी पुण्यातील खराडी भागात आले होते. येथील एका ज्वेलरी शोरूमचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शोरूममधील दागिण्यांची पाहणी केली. या दागिण्यांची माहिती घेतली. तब्बल 17 तासानंतर अजित पवार प्रकटले. विशेष म्हणजे ते पत्नीसोबत होते. त्यामुळे अजित पवार हे पुण्यातच असावेत असा कयास वर्तवला जात आहे. किंवा अजितदादा मुंबईवरून रात्री पुण्यात आले असावेत असंही सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

भरगच्च कार्यक्रम

दरम्यान, आज पुणे आणि पिंपरीचिंचवडमध्ये अजित पवार यांचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत. संध्याकाळपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम रद्द झाल्याचं आयोजकांनी अजून सांगितलेलं नाही. त्यामुळेअजितदादा या कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियात चर्चा

अजितदादा काल बारामती हॉस्टेवरून निघाले होते. ते दुपारी कोरेगाव पार्कमध्ये आले. त्यानंतर त्यांनी अचानक सर्व कार्यक्रम रद्द केले. दोन दिवसांचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले. त्यानंतर अजित पवार घटनास्थळावरून अज्ञातस्थळी रवाना झाले. अजितदादांनी अचानक कार्यक्रम रद्द केले. त्यांचा मोबाईलही लागत नव्हता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

अजितदादा पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत तर नाही ना? असा सवाल केला जात होता. सोशल मीडियावरूनही अजितदादांच्या गायब होण्याची चर्चा रंगली होती. अजितदादा पुन्हा भाजपशी हात मिळवणी करणार असल्याचं सांगितलं जात होतं. तर अजितदादा आता गुवाहाटीला नाही तर अयोध्येला जाणार असल्याचं काही नेटकरी म्हणत होते. त्यामुळे काल दिवसभर अजितदादांच्या गायब होण्याचीच चर्चा होती.