अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द

पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली.

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 12:11 PM

पुणे : पुण्यात (Pune) आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं (Singhgad ) भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

उड्डाणपुलाचं उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

वाहनांचे हॉर्न बदलणार, अॅम्ब्युलन्सचा सायरनही बदलणार

पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं.

माझी इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे – नितीन गडकरी

माझी आयुष्यात एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणं, शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात.  मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही. त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं., ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली आहे, १ लि. पेट्रोल बरोबर १ लि इथेनॉल.

मी राजीव बजाजला बोलावतो, पुण्यातील ऑटो, बाईक, मी तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्यू पासून मर्सिडीज, टाटा महिंद्रा सर्वांना फ्लेक्स इंजिन पेट्रोलचं बनवावं लागेल, ज्यात शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवावा लागेल.

साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली तर गाड्या चालतील, प्रदूषण बंद होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. इथेनॉलसाठी मी पंतप्रधानांना विनंती केली,त्यांनी तीन पंप पुण्यात दिले. माझा ट्रॅक्टर सीएनजीवर आहे, १ लाख रुपये वर्षाला वाचतोय, असं नितीन गडकरी म्हणाले.

VIDEO :

संबंधित बातम्या  

नितीन गडकरींचा ‘सिक्सर’, लहान आणि स्वस्त कारमध्येदेखील 6 एअरबॅग्स देण्याचं कंपन्यांना आवाहन

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून दरमहा किती कमाई?; नितीन गडकरी म्हणतात…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.