…आणि बारामतीत बघता बघता दादांच्याभोवती रविवारीही गराडा पडला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे नागरिकांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. (Ajit Pawar Baramati)

...आणि बारामतीत बघता बघता दादांच्याभोवती रविवारीही गराडा पडला...
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 12:03 PM

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामतीमध्ये आहेत. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांनी बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधला. विद्या प्रतिष्ठान येथे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अजित पवार बारामती पहिल्यांदा आले असल्यानं नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी देखील भेटीसाठी गर्दी केली होती. (Ajit Pawar meet peoples of Baramati and solve issue of them )

अजित पवारांच्या बारामतीमधील जनता दरबाराची पद्धत

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये असतात त्यावेळी परिसरातील गावातील नागरिक रोजगाराच्या समस्या, विविध शासकीय योजनांचे प्रश्न, वीज जोडणी, शेतीविषयक अडी-अडचणी घेऊन अजित पवारांना भेटत असतात. अजित पवारांच्या जनता दरबारात विविध शासकीय अधिकारी उपस्थित असतात. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न अजित पवार समजून घेतात आणि त्या प्रश्नांची नोंद घेण्याचे आदेश किंवा शक्य असल्यास त्याच ठिकाणी प्रश्न सोडवण्याचे आदेश देतात. बारामतीमध्ये होणाऱ्या जनता दरबारात मागील प्रश्न सोडवले गेले का? याचा आढावा अजित पवार घेतात.

अजित पवारांना भेटण्यासाठी तालुक्यातील नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. अजित पवार भेटायला आलेल्या प्रत्येक नागरिकाजवळ जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतात. त्यावेळी विविध विभागांचे अधिकारी देखील तिथे उपस्थित असतात. बारामतीचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात असल्यानं गेली 50 वर्ष बारामतीकर देखील पवार कुटुंबीयांवर प्रेम करतात, असं बारमतीमधील नागरिकांनी सांगतिले.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अजित पवार प्रथमच बारामतीमध्ये

राज्यात नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. 18 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. अजित पवार ग्रामपंचायत निवडणुकींनंतर प्रथमच बारामती पोहोचले आहेत. बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या:

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!, शिवाजी कर्डीले पुन्हा रिंगणात

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

(Ajit Pawar meet peoples of Baramati and solve issue of them )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.