राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?; अजितदादांनी आकडा सांगितला

Ajit Pawar on 12 Legislative Council Seats : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या `12 जागांबाबत महत्वाचं विधान केलं आहे. यातील किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार? राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागा लढणार? यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. वाचा,,,

राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?; अजितदादांनी आकडा सांगितला
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 7:20 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहे. इथे त्यांनी डीपीडीसी बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांवर भाष्य केलं. राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद जागांपैकी भाजपकडे 6 जागा असतील. एकनाथ शिंदे यांना 3 जागा आणि आम्हाला 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे. आमची इच्छा होती की 4-4 तिघांना जागा मिळाव्या. पण तसं होण्याची शक्यता कमी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पावसावर अजित पवार काय म्हणाले?

हवामान खात्याने रेड अलर्ट दिला की पाऊस पडत नाही असं होतंच…. पण अजूनही धो धो पावसाची अपेक्षा आहे. सकाळी आढावा घेतला आहे. पाणी धरणात चागलं झालं आहे पण अजून पाऊस पडायला हवा. महिलांना समृध्द करण्यासाठी 15 ऑगस्ट ला त्यांच्या खात्यावर पैसे देण्याचा मानस आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

‘धडपड भाग 2’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुस्तक प्रकाशन वेळ द्यायला उशीर झाला. व्यस्त होतो पण वेळ काढावा लागतो. मीच अगोदरच्या भागाचं पण पुस्तक प्रकाशन केलं होतं. धडपड भाग 2 आज प्रकाशन झाल अस जाहीर करतो. पुस्तक किंमत कमी दरात ठेवलं आहे. शून्यातून जग ज्यांनी निर्माण केलं,या पुस्तकातील अनेक शी संबंध आला आहे. कमी शब्दात एका एकाचा उल्लेख केला आहे,खूप लोकांबद्दल लिहलं आहे. अनेकांच्या या बाबतीत लिहिलं आहे. श्याम दौंडकर यांची कारकीर्द पहिली आहे, त्याचं मी अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले.

माझ्या धडपडीची किस्से लिहिले आहे पण ऐकीव लिहिले आहे. मला विचारले असते तर मी अजून किस्से सागितले असते. त्यांनी माझ्यावर जास्त लिहण्यापेक्षा स्वतःवर लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजकीय समजिक जडणघडण कशी घडली ते सगळं लिहलं आहे. अगोदर प्रिंट होतच पण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आली. अनेक जण सोशल मीडियावर लिहित असतात. पत्रकार पण चुकतात हे पण त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. त्याबद्दल त्याच आभार…, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.