पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) जिथे जातात तिथे काही ना काही बातमी मिळतेच. कधी अजितदादा अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतात, कधी कार्यकर्त्यांची शाळा घेतात, कधी सूचना देतात, कधी ओरडतात तर कधी राजकीय (politics) टोलेबाजी करतात. त्यामुळे अजितदादा जे काही करतात त्याची आपसूकच बातमी होते. आज अजितदादा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आले होते. जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने अजित पवार हे विद्यापीठात आले होते. यावेळी ते शुटिंग रेंजमध्ये गेले. हातात रायफल (rifle shooting) घेतली. अन् प्रशिक्षकाकडे नजर रोखून म्हणाले, काय? तेव्हा प्रशिक्षक म्हणाले, दादा, रायफल हातात घ्या. त्यानंतर दादांनी रायफल व्यवस्थित हातात घेतली. प्रशिक्षक म्हणाले परफेक्ट. त्यानंतर दादा म्हणाले, काहीही बोलतो. नंतर दादांनी रायफलने नेम धरला, दादांनी सराईतपणे रायफलने नेम धरल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. त्यानंतर दादांनी शुटींग रेंज रायफल नेमकी कशी काम करते याची माहिती घेतली. ऑलम्पिकसाठी एवढंच मैदान असतं का? अशी विचारणाही त्यांनी केली.
अजित पवार यांनी यावेळी विद्यापीठ परिसरात झाडही लावलं. झाड लावताना त्यांनी हे कोणतं झाड आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी कर्मचारी म्हणाला लिंबाच झाडं. तेव्हा दादा म्हणाले, अरे कोणत्या विभागातून आणलंय? त्यानंतर त्यांनी झाड लावलं.
त्यानंतर दादा फुटबॉल मैदानावर गेले. सगळ्या मैदानाची माहिती घेतली. विद्यापीठाच्या क्रिकेट स्टेडियमवर रणजी सामने खेळवता येईल का? अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी दादांना फुटबॉल खेळण्याची विनंती केली. तेव्हा दादा म्हणाले, मी नाही, उदय. मी चप्पल घातलीये. पण लोकांच्या आग्रहास्तव दादांनी शेवटी फुटबॉलला किक मारलीच. दादांनी किक मारलेला फुटबॉल कँमेरामनला जाऊन धडकला. त्यावर दादा लगेच म्हणाले, मी म्हणालो होतो ना लागल. त्यानंतर दादांनी हात जोडले आणि तिथून निघाले.
नंतर दादा जिमच्या विभागात गेले तेव्हा जाताना दादानी विचारलं याचं नियोजन कसं केलंय. किती लोक एकावेळी बसू शकतात? त्यावर कर्मचारी म्हणाला, 16 लोक बसतील. त्यावर दादांनी थेट सगळं सामानचं मोजलं. तर आकडा 10 होता. तेव्हा कर्मचारी 12 म्हणाले. दादा म्हणाले, दहाच की. त्यावर कर्मचारी म्हणाला, सर, 16 वस्तू आहेत. त्यावर दादा प्रमाने म्हणाले, देऊ का कानाखाली.