‘कोयता गँगचा सुफडा साफ करणार’, अजित पवार यांचं पुणेकरांना आश्वासन

पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता गँगचा सुफडा साफ करण्याचं आश्वासन पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना दिलं आहे. त्यामुळे आता कोयता गँगवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

'कोयता गँगचा सुफडा साफ करणार', अजित पवार यांचं पुणेकरांना आश्वासन
ajit pawar
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 6:16 PM

पुणे | 10 मार्च 2024 : पुण्यात कोयता गँगची दहशत बघायला मिळते. कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते. तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात. त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुफडा साफ करणार, असं आश्वासन दिलं आहे. “कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. “कोयता गँगचा सुफडा साफ करणार”, असंही आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. “कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं कितीही मोठ्या बापाचं असलं तरी सुद्धा आता काही चालणार नाही. काही लोकं म्हणतात की आत्ता चूक झाली पदरात घ्या! आता पदर फाटला. पदर नाही, धोतर नाही आता डायरेक्ट टायरमध्ये”, असं अजित पवार बेधडकपणे म्हणाले.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“आम्ही कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न करतोय. मी जाहीरपणे सांगतो. आम्ही आजच पोलीस आयुक्तांना पुन्हा सांगितलं आहे. कोयता गँग कोयता गँग, कसली रे कोयता गँग? या कोयता गँगवाल्यांचा तर सुफडा साफच करुन टाकणार आहे. या गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं कुणीही, कितीही मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्या मुलाहीजा ठेवला जाणार नाही. म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो. उद्या कुणी म्हटलं की, दादा एकदा चूक झाली. पदरात घ्या. आमचा आता पदर फाटला आहे. पदरात घेण्यासारखी परिस्थिती नाही. पदर नाही आणि धोतरही नाही. डायरेक्ट टायरमध्येच. मध्ये कुठे नाही”, असं अजित पवार म्हणाले

‘विरोधकांकडे आता मुद्दा नाही’

“विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही. ते म्हणतात सगळं गुजरातमध्ये चाललंय. जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्राचंच राहणार. काही राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेतात, विद्यापीठ पूल काढावा लागला. तुमची सहनशीलता संपलेली आहे. विक्रम कुमार काम जोरात करा. आम्ही मंत्रालयात बसून सगळे प्रश्न मार्गी लावायचे काम करतो. सगळे आमदार या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत. राज्यातील विकास कामांचे प्रकल्प पूर्ण करणार आहोत. पुण्यात ११७५ कोटी रुपयांचे आज भूमिपूजन झालं आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण काम झालं पाहिजे. णेकरांना सुविधा देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.