मोठी बातमी, अजित पवार गोविंद बागेत दाखल, शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा भेट घडून आली आहे. याआधी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून आली होती. त्यानंतर आता गोविंद भागेत दोन्ही नेत्यांची भेट घडून आली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.

मोठी बातमी, अजित पवार गोविंद बागेत दाखल, शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
Sharad pawar-Ajit pawar
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 9:05 PM

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 14 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिवाळीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या गोविंद बागेत भेटीगाठी घेत आहेत. पवार कुटुंबिय दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गोविंद बागेत एकत्र येतात. यावर्षीदेखील पवार कुटुंबिय गोविंद बागेत एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गोविंद बागेत आले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार हे देखील गोविंद बागेत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे गोविंद बागेत आज दुपारी झालेल्या पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राज्यभरात याबाबत चर्चा सुरु होती. कारण अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत असायचे. पण आज ते उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण आता गोविंद बागेत अजित पवार दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार शरद पवार यांच्यासह स्नेहभोजन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र साजरा होणार आहे.

अजित पवार आज सकाळी काटेवाडीत दाखल

अजित पवार आज सकाळीच काटेवाडीत आल्याची माहिती समोर आली होती. पण काटेवाडीत असूनही अजित पवार आज दुपारी गोविंद बागेत आले नाहीत, अशी चर्चा सुरु होती. काटेवाडीत भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच ते आज काटेवाडीत दाखल झाले. ते आज दुपारी गोविंद बागेत दाखल झाले नाहीत. पण रात्री शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजनासाठी ते गोविंद बागेत दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज सकाळपासून शरद पवार यांची गोविंद बागेत येवून भेट घेत आहेत. ते शरद पवारांचा आशीर्वाद घेत आहेत. पण सकाळपासून अजित पवार गोविंद बागेत न आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण अजित पवार रात्री स्नेहभोजनासाठी गोविंद बागेत आले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची गोविंद बागेतील ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीत काय-काय चर्चा होतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.